सांगली अर्बन बँकेसाठी ७४ अर्ज
By Admin | Updated: April 9, 2015 00:03 IST2015-04-08T23:13:08+5:302015-04-09T00:03:11+5:30
आज छाननी : गाडगीळ गटाचे शक्तिप्रदर्शन

सांगली अर्बन बँकेसाठी ७४ अर्ज
सांगली : सांगली अर्बन बँकेच्या १७ जागांसाठी ७४ अर्ज दाखल केले. बुधवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्यादिवशी विरोधी गाडगीळ गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. गुरुवारी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे.
सांगली अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी गटाने सोमवारी पॅनेल जाहीर करून उमेदवारी अर्जही दाखल केले होते. बुधवारी विरोधी गणेश गाडगीळ यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलच्यावतीने अर्ज दाखल करण्यात आले. गाडगीळ पॅनेलमधून बँकेचे संस्थापक अण्णासाहेब गोडबोले यांच्या कन्या वासंती पराडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अर्बन बँकेसाठी ५२ उमेदवारांनी ७४ अर्ज दाखल केले आहेत. उद्या अर्जांची छाननी होणार आहे.
बँकेचे एकूण ५९ हजार सभासद आहेत. त्यापैकी तीन हजार सभासद थकबाकी व इतर कारणांमुळे अंतिम मतदार यादीतून वगळण्यात आले आहेत. निवडणुकीसाठी आता ५६ हजार मतदार आहेत. उपनिबंधक डॉ. एस. एन. जाधव निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहात आहेत. बँकेसाठी दहा मे रोजी मतदान होणार आहे. (प्रतिनिधी)...
गाडगीळ पॅनेलचे उमेदवार जाहीर
गणेश गाडगीळ, संजय परमणे, अनंत मानवी, एस. वाय. पाटील, संजय धामणगावकर, संजय ज्योतीराम पाटील, बापू हरिदास, शैलेंद्र तेलंग, अॅड. रणजित चव्हाण, अशोक पवार, विकास खिरे, महावीर कर्वे, श्रीकांत पटवर्धन, डॉ. रवींद्र आरळी, सुमंत महाजन, श्रीकांत देशपांडे (वसमतनगर), प्रभाकर देशमुख (परभणी), अरविंद कोरडे, अनिल कोरडे, वासंती पराडकर, डॉ. सई मंद्रुपकर, भारती दिगडे, रमेश भाकरे, प्रमोद भोकरे, सागर घोंगडे, अविनाश पोतदार (चारजणांचे डमी अर्ज आहेत)