शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
2
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
3
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
4
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
5
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
6
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
7
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
8
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
9
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
10
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
11
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
12
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
13
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
14
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
15
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
16
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
17
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
18
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
19
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
20
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!

सांगली जिल्ह्यातील आठ नगरपालिका क्षेत्रात ७,०४३ दुबार मतदार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 19:49 IST

Municipal Election: एकच मतदान करता येणार, अन्य ठिकाणचे नाव ब्लॉक होणार

सांगली : जिल्ह्यातील आठ नगरपालिका ठिकाणी निवडणुकीची धामधूम चालू आहे. या गडबडीतच प्रशासनाच्या मतदार यादी पडताळणीमध्ये सहा नगर परिषद आणि दोन नगरपंचायतींच्या क्षेत्रात सात हजार ४३ दुबार मतदार सापडले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली. या मतदारांचे दोन ठिकाणी मतदान होऊ नये, यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. दुबार मतदारांशी संपर्क करून एकाच ठिकाणी मतदान करण्याबाबतची सहमती घेऊन अन्य ठिकाणचे नाव ब्लॉक करण्यात येणार आहे.उरुण-ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत, पलूस या नगर परिषद आणि शिराळा, आटपाडी नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. या पालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबंधित मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित विधानसभा मतदारसंघाची मतदार याद्यी वापरून ती प्रभागनिहाय छाननी केली. जिल्ह्यातील सहा नगर परिषद आणि दोन नगरपंचायतींसाठी दोन लाख ५७ हजार ९७७ मतदारांची नोंद आहे. मतदार यादी कार्यक्रम सुरू असताना, प्रशासनाला चक्क सात हजार ४३ दुबार मतदार असल्याचे आढळून आले.दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार करण्यात आला आहे. एकूण मतदार संख्येच्या तुलनेत हे प्रमाण २.७३ टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील शहरी मतदार यादीत एवढ्या मोठ्या प्रमाणात दुबार नोंदी आढळणे म्हणजे डेटा व्यवस्थापनातील गंभीर त्रुटी आहेत. आठ नगर परिषद, नगरपंचायतीने दुबार मतदारांची संख्या सात हजार ४३ असणे ही लक्षणीय बाब आहे. निवडणुकीपूर्वी संपूर्ण यादी तपासणे आवश्यक असल्याचे मत विरोधकांकडून व्यक्त केले जात आहे.मतदार यादीत दुबार मतदार असले, तरी संबंधित मतदारांसाठी मोहीम राबवण्यात येत आहे. दुबार मतदारांना विचारात घेऊन त्यांच्या पसंतीने एकाच प्रभागात मतदान करता येणार आहे. दुबार मतदार नोंदीची माहिती प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध केली जाणार आहे. संबंधित मतदार एकापेक्षा अधिक मतदान केंद्रावर मतदान करणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली.

नगर परिषद-नगरपंचायत / एकूण मतदार / दुबार मतदार / मतदान केंद्र संख्या

  • उरुण-ईश्वरपूर / ६४,२१५ / २,५७० / ६७
  • विटा / ४६,३३२ / ९८० / ४९
  • आष्टा / ३०,५७३ / ८९२ / ३७
  • तासगाव / ३२,९९४ / ७३५ / ३६
  • जत / २८,०९० / ५५२ / ३४
  • पलूस २२,०६७ / ५९० / २६
  • शिराळा १३,०९५ / १८१ / १७
  • आटपाडी २०,६११ /५४३ / २५

उरुण-ईश्वरपूरमध्ये सर्वाधिक दुबार मतदारजिल्ह्यात सात हजार ४३ दुबार मतदार सापडले आहेत. यामध्ये सर्वाधिक दोन हजार ५७० दुबार मतदार उरुण-ईश्वरपूर नगर परिषदेमध्ये आढळून आले आहेत. सर्वात कमी १८१ दुबार मतदार शिराळा नगरपंचायतीमध्ये सापडले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: 7,043 duplicate voters found in eight municipal areas.

Web Summary : Over 7,000 duplicate voters were discovered across eight Sangli municipal areas during election preparations. Authorities are ensuring voters cast ballots only once, blocking duplicate entries after consent. Urun-Islampur has the highest number.