मागासवर्गीय संस्थेत ७० लाख अपहार
By Admin | Updated: December 19, 2014 00:16 IST2014-12-18T23:30:55+5:302014-12-19T00:16:46+5:30
संस्थेच्या स्थापनेसाठी १७० सभासदांकडून प्रत्येकी २० हजार रुपयेप्रमाणे भागभांडवल जमा करण्यात आले होते

मागासवर्गीय संस्थेत ७० लाख अपहार
मिरज : मिरजेतील शाकंभरी मागासवर्गीय औद्योगिक संस्थेत सचिवाने ७० लाखांचा अपहार केल्याची तक्रार संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब सातपुते यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. उपनिबंधक डॉ. एस. एन. जाधव यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.
शाकंभरी मागासवर्गीय औद्योगिक संस्थेतर्फे शासनाला कांडी कोळसा निर्मिती उद्योगासाठी शासनाकडे अनुदानाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. संस्थेच्या स्थापनेसाठी १७० सभासदांकडून प्रत्येकी २० हजार रुपयेप्रमाणे भागभांडवल जमा करण्यात आले होते. शासनाकडून अनुदान मिळालेली रक्कम बँक आॅफ इंडियातील संस्थेच्या खात्यावर जमा करण्यात आली होती. ही रक्कम सचिव हरिष लाटणे यांनी परस्पर काढून रकमेचा अपहार केल्याची तक्रार आहे. अपहाराची रक्कम संबंधितांकडून वसूल करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब सातपुते यांनी केली आहे. जिल्हा उपनिबंधक डॉ. एस. एन. जाधव यांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली असून, सचिव लाटणे यांना संस्थेच्या आर्थिक उलाढालीचा हिशेब सादर करण्याचे आदेश दिले आहेत. लाटणे इचलकरंजीतील माजी नगरसेवक आहेत. (वार्ताहर)