म्हैसाळ परिसरात ७० कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:25 IST2021-04-18T04:25:03+5:302021-04-18T04:25:03+5:30
या केंद्रांतर्गत म्हैसाळ एक, म्हैसाळ दोन, नरवाड, ढवळी, वड्डी, इनामधामणी, अंकली या मोठ्या गावांचा समावेश होतो. आजअखेर या आरोग्य ...

म्हैसाळ परिसरात ७० कोरोना रुग्ण
या केंद्रांतर्गत म्हैसाळ एक, म्हैसाळ दोन, नरवाड, ढवळी, वड्डी, इनामधामणी, अंकली या मोठ्या गावांचा समावेश होतो. आजअखेर या आरोग्य केंद्रांतर्गत ३८ महिला व ३२ पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. दोघांची प्रकृती चिंताजनक असून, एकाचा मुत्यू झाला आहे. ६८ जण होम क्वारंटाइन असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, शनिवारी सकाळी चक्कर येऊन पडल्याने त्या महिलेला उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचा मृत्यू कोरोनाने झाला की अन्य कोणत्या कारणाने झाला, हे स्पष्ट होऊ शकले नाही.
चौकट
कंटेन्मेंट झोनच नाही
एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तो राहत असलेला भाग कंटेन्मेंट झोन करणे गरजेचे आहे; पण अद्याप तसे केले जात नसल्याने कोणत्या भागात कोरोना रुग्ण आहेत हे समजत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात शहराप्रमाणे दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे.