शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

आटपाडीच्या ५ वर्षीय चिमुकल्याने सर केले कळसुबाई शिखर : १६४६ मीटर उंचीचे शिखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 12:26 PM

अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर सर्वजण पुन्हा खाली निघण्यास निघाले. तेव्हाही षण्मुख पायीच संपूर्ण शिखर उतरून खाली आला.

ठळक मुद्देआई-वडिलांची सोबत ; तहसीलदारांसह अनेकांकडून षण्मुखवर कौतुकाचा वर्षाव

आटपाडी : षण्मुख अमोल हिंडे या पाचवर्षीय चिमुकल्याने आई-बाबांसोबत महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई हे शिखर सर केले. षण्मुख हा आटपाडीतील डायनामिक इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बालवाडीत शिकतो. आटपाडी तहसील कार्यालयातील लिपिक निशिगंधा हिंडे यांचा तो मुलगा आहे.

आई, वडील व षण्मुख कळसुबाई शिखर पाहण्यासाठी गेले होते. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असतानाच षण्मुख ‘मी चालत शिखर चढणार’ असा हट्ट करू लागला. त्याचा निश्चय पाहून तेथील मार्गदर्शकदेखील त्याचे कौतुक करायला लागले. सुरुवातीला गंमत  म्हणून आई-वडिलांनीही त्याला परवानगी दिली. पण तो शेवटपर्यंत पायीच चढून गेला. दुपारी साडेबारा वाजता सर्वजण कळसुबाई शिखरावर पोहोचले. अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर सर्वजण पुन्हा खाली निघण्यास निघाले. तेव्हाही षण्मुख पायीच संपूर्ण शिखर उतरून खाली आला.

१६४६ मीटर उंच असलेल्या या कळसुबाई शिखरावर चढाई करण्याचा विचारच अनेकांच्या मनात धडकी भरवतो. अनेकजण अर्ध्यातूनच परतत असतात. असे असताना पाच वर्षाच्या षण्मुखने केलेली चढाई कौतुकाचा विषय बनली आहे.

टॅग्स :SangliसांगलीTrekkingट्रेकिंग