CoronaVirus updates -जिल्ह्यात कोरोनाचे नवे ६५७ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 13:17 IST2021-04-14T04:25:26+5:302021-04-14T13:17:50+5:30
CoronaVirus updates Sangli: सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मंगळवारी दिवसभरात नवे ६५७ रुग्ण आढळून आले. तर दहा जणांचा मृत्यू झाला. महापालिका क्षेत्रात सर्वाधिक १४२, तर कडेगाव व वाळवा तालुक्यात शंभरहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दिवसभरात २६५ जणांनी कोरोनावर मात केली.

CoronaVirus updates -जिल्ह्यात कोरोनाचे नवे ६५७ बाधित
सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मंगळवारी दिवसभरात नवे ६५७ रुग्ण आढळून आले. तर दहा जणांचा मृत्यू झाला. महापालिका क्षेत्रात सर्वाधिक १४२, तर कडेगाव व वाळवा तालुक्यात शंभरहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दिवसभरात २६५ जणांनी कोरोनावर मात केली.
जिल्ह्यात आतापर्यंत ५६ हजार ७३७ जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी ५० हजार ४४४ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या ४४३१ सक्रिय रुग्ण आहेत. मंगळवारी महापालिका क्षेत्रात १४२ रुग्ण आढळून आले. त्यात सांगलीत ७६, तर मिरजेतील ६६ रुग्णांचा समावेश आहे. त्याखालोखाल कडेगाव तालुक्यात १०५ तर वाळवा तालुक्यात १०३ जणांना कोरोनाची लागण झाली. जत ३३, खानापूर ६२, तासगाव तालुक्यात ३५, आटपाडीत ४५,पलूस ३५, कवठेमहांकाळ ११, मिरज ३८, शिराळा तालुक्यात ४७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. कोल्हापूर ८, सोलापूर व बेळगाव येथील प्रत्येकी ३ रुग्ण. उस्मानाबाद १, सातारा ६ व पुणे जिल्ह्यातील एक असे परजिल्ह्यातील २२ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत.
दिवसभरात खानापूर, पलूस, तासगाव, जत, मिरज, शिराळा, वाळवा आणि सांगली येथील प्रत्येकी एक तर मिरजेतील दोन अशा दहा रुग्णांचा मृत्यू झाला, तर २६५ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या ७०३ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील ५९८ जण ऑक्सिजनवर, ५९ जण नाॅन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर, ४० जण हायफ्लो नेेझल ऑक्सिजनवर तर ६ जण इन्व्हेजीव व्हेंटिलेंटरवर आहेत.
- आतापर्यंतचे बाधित : ५६७३७
- कोरोनामुक्त झालेले : ५०४४४
- उपचाराखालील रुग्ण : ४४३१
- आतापर्यंतचे मृत्यू : १८६२
सोमवारी दिवसभरात
- सांगली : ७६
- मिरज : ६६
- आटपाडी : ४५
- कडेगाव : १०५
- खानापूर : ६२
- पलूस : ३५
- तासगाव : ३६
- जत : ३३
- कवठेमहांकाळ : ११
- मिरज : ३८
- शिराळा : ०४७
- वाळवा : १०३