शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत नोकरीच्या आमिषाने तरुणांना ६० लाखाचा गंडा, सांगलीतील वेजेगावाच्या गलाई व्यावसायिकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 14:25 IST

चार तरुणांची फसवणूक करुन उकळले पैसे

विटा (सांगली) : रेल्वेतील नोकरीच्या आमिषाने खानापूर, आटपाडी, वाळवा तालुक्यांतील चार तरुणांना तब्बल ५८ लाख ७५ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. या प्रकरणी वेजेगाव (ता. खानापूर) येथील बालाजी भीमराव देवकर (वय ६५) या गलाई व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे.वेजेगाव येथील बालाजी देवकर गलाई व्यावसायिक आहे. त्याने रेल्वेमध्ये ग्रुप सी पदाकरिता नोकरी लावण्यासाठी भिकवडी बुद्रुक येथील प्रवीण विलास खुपकर या तरुणास आमिष दाखवले. त्यावेळी त्याने प्रत्येकी १५ लाख रुपये मागितले. रेल्वेत नोकरी मिळणार या आशेपोटी प्रवीण खुपकर यांनी १३ लाख ७५ हजार रुपये ठकसेन देवकर यास दिले.

रेल्वेत नोकरी मिळत असल्याचे खुपकरचे मित्र महावीर विलास पोकळे (रा. जांभुळणी, ता. आटपाडी), महेंद्र चंद्रकांत नलवडे (रा. वलखड, ता. खानापूर) आणि सुनील अर्जुन पवार (रा. किल्ले मच्छिंद्रगड, ता. वाळवा) यांना समजल्यानंतर त्यांनीही देवकर याची भेट घेतली. त्यावेळी देवकर याने त्या तिघांनाही रेल्वेत सी ग्रुपपदी नोकरी लावण्याचे आमिष दाखविले.देवकरने त्यांच्याकडून प्रत्येकी १५ लाख रुपये घेतले. असे चौघांकडून ५८ लाख ७५ हजार रुपये उकळले. त्यानंतर देवकरने भारतीय रेल्वेचे आणि भारत सरकारचे बनावट शिक्के व बनावट कागदपत्रे तयार करून चौघांना थेट रेल्वे भरतीचे नियुक्तीपत्रही दिले. परंतु नोकरभरतीत फसवणूक झाल्याचे या तरुणांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत देवकरला जाब विचारला व पैसे परत देण्याची मागणी केली; पण पैसे परत देण्यास त्याच्याकडून टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे प्रवीण खुपकर याने विटा पोलिसांत फिर्याद दिली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस