शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

वसंतदादा कारखान्याच्या जमीन लिलावातून ५.८७ कोटी वसूल, तहसीलदारांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 11:49 PM

विक्रीकर व कामगारांच्या देय असलेल्या ५२ कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी सांगलीतील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या दोन जमिनींचा लिलाव करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे विक्रीकर, कामगारांची रक्कम मिळणार

मिरज : विक्रीकर व कामगारांच्या देय असलेल्या ५२ कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी सांगलीतील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या दोन जमिनींचा लिलाव करण्यात आला आहे. कारखान्याच्या जमिनीच्या विक्रीतून ५ कोटी ८७ लाख रुपये वसूल झाले असून, ही रक्कम विक्रीकर विभाग व कामगारांना देण्यात येणार असल्याचे तहसीलदार शरद पाटील यांनी गुरुवारी सांगितले.

सांगलीतील वसंतदादा साखर कारखान्याचा सुमारे ५ कोटी रुपये विक्रीकर व ८७ लाख रुपये कामगारांची देणी थकीत असल्याने दोन वर्षांपूर्वी महसूल वसुली प्रक्रिया सुरू करून कारखान्याच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यात आला. मालमत्ता जप्तीच्या तीन नोटिसा बजावल्यानंतही थकबाकीची रक्कम वसूल झाली नसल्याने कारखाना मालमत्तेच्या सात-बारा उताऱ्यावर शासनाची नोंद करण्यात आली.

कारखान्याच्या माधवनगर (ता. मिरज) येथील ५६ गुंठे व ४० गुंठे जमिनीचा लिलाव करण्यात आला. मात्र खरेदीदारांचा प्रतिसाद मिळाला नसल्याने लिलावाची प्रक्रिया गेले वर्षभर सुरू होती. अखेर ५६ गुंठे जमिनीची ५ कोटी रुपयांना व ४० गुंठे जमिनीची ८७ लाख रुपयांना विक्री झाली असून, खरेदीदाराने ही रक्कम जमा केली आहे.

साखर कारखान्याच्या मालमत्तेच्या लिलावाद्वारे ५ कोटी ८७ लाख रुपये वसूल झाले असल्याने महसूल वसूल प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र २०१३ व २०१४ च्या उसाचे बिल ४६ कोटी ३९ लाख रुपये व इतर थकीत देणी शेतकºयांना मिळालेली नसल्याने साखर आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव व वसुली प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.' शेतकºयांचे पैसे दिलेआतापर्यंत थकबाकीपैकी ९० टक्के शेतकºयांची देणी दिली असल्याने महसूल वसुली प्रक्रिया रद्द करण्याची मागणी कारखान्याच्या व्यवस्थापनाने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीVasant Sugar Factoryवसंत साखर कारखानाMONEYपैसा