जिल्ह्यात कोरोनाचे नवे ५८० रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:32 IST2021-08-18T04:32:53+5:302021-08-18T04:32:53+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार कायम आहे. मंगळवारी नवे ५८० रुग्ण आढळून आले, तर ६८० जणांनी कोरोनावर मात ...

जिल्ह्यात कोरोनाचे नवे ५८० रुग्ण
सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार कायम आहे. मंगळवारी नवे ५८० रुग्ण आढळून आले, तर ६८० जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यातील १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
मंगळवारी महापालिका क्षेत्रात ९७ रुग्ण आढळून आले. त्यात सांगलीत ५८, मिरजेतील ३९ रुग्णांचा समावेश आहे. आटपाडी तालुक्यात ६२, जत ४५, कडेगाव ३६, कवठेमहांकाळ ६२, खानापूर ४७, मिरज ६७, पलूस ३४, शिराळा ८, तासगाव ५८, वाळवा ६४; तर जिल्ह्याबाहेरील सोलापूर, कोल्हापूर, कर्नाटकातील १२ रुग्णही उपचारासाठी दाखल झाले आहेत.
दिवसभरात जिल्ह्यातील १४ जणांचा मृत्यू झाला. त्यात कडेगाव, वाळवा, शिराळा, सांगली येथील प्रत्येकी १, खानापूर, जत प्रत्येकी २, मिरज व तासगाव तालुक्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. सध्या ७१४ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. आरटीपीसीआरच्या ४२३२ चाचण्यांत २७९ पाॅझिटिव्ह, तर अँटिजनच्या ७७६१ चाचण्यांत ३१३ रुग्ण सापडले.
चौकट
आतापर्यंतचे बाधित : १,८६,१६०
कोरोनामुक्त झालेले : १,७५,७७९
आतापर्यंतचे मृत्यू : ४,८९५
उपचार घेत असलेले : ५,४८६
चौकट
मंगळवारी दिवसभरात...
सांगली : ५८
मिरज : ३९
आटपाडी : ६२
जत : ४५
कडेगाव : ३६
कवठेमहांकाळ : ६२
खानापूर : ४७
मिरज : ६७
पलूस : ३४
शिराळा : ०८
तासगाव : ५८
वाळवा : ६४