शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील द्राक्ष व्यापाऱ्याला ५७ लाखांचा गंडा, संशयित दोघे गुजरातचे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 12:00 IST

५५० टन द्राक्ष खरेदी करूनही पैसे देण्यास टाळाटाळ

सांगली : द्राक्ष मालाची खरेदी करून पैसे न देता द्राक्ष व्यापाऱ्याला तब्बल ५६ लाख ६७ हजार ९२० रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी मारुती नामदेव टेंगले (रा. जामवाडी, सांगली) यांनी शहजाद शेख (रा. अहमदाबाद, गुजरात) आणि दिवाणजी अहमद खान (रा. आणंद, गुजरात) यांच्याविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १ फेब्रुवारी ते १४ सप्टेंबर या कालावधीत हा प्रकार घडला.फिर्यादी मारुती टेंगले हे द्राक्ष विक्रीचे कमिशन एजंट म्हणून काम करतात. पेठभाग, जामवाडी येथील अंजली फ्रुट सेंटर ॲण्ड सप्लायर्सद्वारे ते हा व्यवसाय करतात. गुजरात येथील संशयितांनी ए वन कंपनीच्या माध्यमातून टेंगले यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी टेंगले यांचा विश्वास संपादन केला आणि द्राक्ष मालाची खरेदी केली होती. टेंगले यांनी मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांकडून माल खरेदी करून तो संशयितांना दिला होता. माल घेतल्यानंतर त्यांनी रोखीने पैसे देणे अवघड असल्याचे सांगत त्यांना २५ लाख रुपयांचे पाच धनादेश दिले होते. यानंतर टेंगले यांनी ५५० टन द्राक्ष खरेदी करून गुजरातमध्ये नेते होते. ज्याची किंमत एक कोटी ७८ लाख ८१ हजार ५८२ रुपये इतकी झाली होती. संशयितांनी यातील एक कोटी २४ लाख १३ हजार ६६५ रुपये परत दिले. मात्र, उर्वरित रक्कम दिली नाही. उर्वरित ५४ लाख ६७ हजार ९२० रुपये आणि कामगारांची मजुरी दोन लाख रुपये, असे ५६ लाख ६७ हजार ९२० रुपये परत मिळावेत यासाठी टेंगले प्रयत्नशील होते.

मात्र, संशयितांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुजरातमधील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीGujaratगुजरात