शिराळा तालुक्यात ५४ नवीन काेराेनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:24 IST2021-04-19T04:24:47+5:302021-04-19T04:24:47+5:30

शिराळा : शिराळा तालुक्यात रविवारी (दि. १८) ५४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये शिराळा व पणुंब्रे वारुण येथे ...

54 new carnage affected in Shirala taluka | शिराळा तालुक्यात ५४ नवीन काेराेनाबाधित

शिराळा तालुक्यात ५४ नवीन काेराेनाबाधित

शिराळा : शिराळा तालुक्यात रविवारी (दि. १८) ५४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये शिराळा व पणुंब्रे वारुण येथे प्रत्येकी ६, आटुगडेवाडी, मिरुखेवाडी, शिरशी येथे प्रत्येकी ५, अंत्री खुर्द, बेलेवाडी येथे प्रत्येकी ४, चरण, इंगरूळ, रेड, मांगले येथे प्रत्येकी २, बिऊर, चिखलवाडी, गिरजवडे, कांदे ,खराळे, मणदूर, निगडी, मालेवाडी, विठ्ठलवाडी, चरण-शाहूवाडी, नवे खेड येथे प्रत्येकी १ असे नवीन ५४ रुग्ण आढळून आले. तालुक्यात सध्या ४४२ रुग्ण उपचार घेत आहेत. मिरज कोविड रुग्णालयात १, शिराळा कोविड सेंटरमध्ये ८, शिराळा कोविड रुग्णालयात ३५, खासगी रुग्णालयात १ रुग्ण दाखल असून ३९७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. दुसऱ्या लाटेत आतापर्यंत पाच रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

Web Title: 54 new carnage affected in Shirala taluka