वेजेगाव येथे ५३ हजाराचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:28 IST2021-04-16T04:28:13+5:302021-04-16T04:28:13+5:30

विटा : बंद घराच्या दरवाज्याची कडी, कोयंडा व कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख सहा हजार रुपये रोखसह ५३ हजार ...

53,000 jewelery lamps at Vejegaon | वेजेगाव येथे ५३ हजाराचे दागिने लंपास

वेजेगाव येथे ५३ हजाराचे दागिने लंपास

विटा : बंद घराच्या दरवाज्याची कडी, कोयंडा व कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख सहा हजार रुपये रोखसह ५३ हजार ६३२ रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना बुधवारी मध्यरात्री वेजेगाव (ता. खानापूर) येथे घडली. या प्रकरणी बालाजी देवकर यांनी गुरुवारी रात्री विटा पोलिसात फिर्याद दिली.

वेजेगाव येथील बालाजी देवकर हे घराला कुलूप लावून मुंबईला गेले होते. अज्ञात चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी चोरट्यांनी कपाटातील रोख ६ हजार रुपये तसेच २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व ३०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व साहित्य असा एकूण ५३ हजार ६३२ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास देवकर हे गावी घरी आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी बालाजी देवकर यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध विटा पोलीस फिर्याद दिली असून हवालदार पाटील पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: 53,000 jewelery lamps at Vejegaon