कुपवाड : महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एक, दोन आणि आठ या तिन्ही प्रभागांतून ५२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता तीनही प्रभागांतून बारा जागांसाठी ६४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी या तिन्ही प्रभागांतून भाजपामध्ये बंडखोरी झाली होती. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी बंडखोरांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने वरिष्ठांची मनधरणी यशस्वी झाली असून, या तिन्ही प्रभागांतून चौरंगी लढतीचे संकेत स्पष्ट झाले आहेत.सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासह छाननी आणि माघारीची प्रक्रिया शुक्रवारी पार पडली आहे. प्रभाग एक, दोन आणि आठमधून ५२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. अर्ज माघारीनंतर तीनही प्रभागांतून बारा जागांसाठी ६४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तिन्ही प्रभागांतून बंडखोरांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने भाजपाच्या वरिष्ठांची मनधरणी यशस्वी झाल्याचे चित्र दिसून आले. या तिन्ही प्रभागांतून भाजपा, राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेसेना यांच्यात चौरंगी लढतीचे संकेत स्पष्ट झाले आहेत. आता प्रभाग एकमध्ये अनुसूचित जाती या गटात महाविकास आघाडीकडून माजी नगरसेवक शेडजी मोहिते, भाजप कडून रविंद्र सदामते , शिंदेसेनेकडून अनिल मोहिते, बहुजन समाज पार्टीकडून क्रांतिकुमार कांबळे, वंचित बहुजन आघाडीच्या कडून शिवाजी वाघमारे व अपक्ष निखिलेश पाटोळे व प्रतीक फाळके यांच्यात लढत होणार तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटात महाविकास आघाडीकडून रईसा रंगरेज तसेच शिंदेसेनेकडून पायल गोसावी, भाजपकडून माया गडदे, तर अपक्ष विद्या खिलारे यांच्यामध्ये चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. सर्वसाधारण महिला गट महाविकास आघाडीकडून अभियंता सूर्यवंशी तर भाजपकडून माजी नगरसेविका पद्यश्री पाटील शिंदेसेनेकडून रेश्मा तुपे, वंचित बहुजन आघाडीकडून निशा बुचटे तर अपक्षमध्ये विद्या जाधव, सुप्रिया देशमुख यांच्यात लढत होणार आहे. सर्वसाधारण गटातून महाविकास आघाडीकडून विजय घाडगे भाजपकडून चेतन सूर्यवंशी, शिंदेसेनेतून संदीप तुपे तर जयहिंद सेनेकडून रणजित पवार यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. तर प्रभाग क्रमांक दोनमध्ये अनुसूचित जाती महिला गटात महाविकास आघाडीकडून माजी नगरसेविका सविता मोहिते, शिंदेसेनेकडून अनिता वनखंडे तर भाजपकडून प्राजक्ता धोतरे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. तर नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून गजानन मगदूम तर भाजपकडून प्रकाश ढंग, महाविकास आघाडीकडून अय्याज नायकवडी, शिंदेसेनेकडून सिद्राम दळवाई, उद्धवसेनेकडून कासम मुल्ला अशी पंचरंगी लढत होणार आहे. तर सर्वसाधारण महिला गटातून भाजपकडून मालूश्री खोत, महाविकास आघाडीकडून प्रेरणा कोळी, तर शिंदेसेनेकडून शमाबी मुजावर, वंचित बहुजन आघाडीकडून महीराज मकानदार यांच्यात लढत होणार. तर सर्वसाधारण गटातून भाजपकडून प्रकाश पाटील,महाविकास आघाडीकडून समीर मालगावे, शिंदेसेनेकडून विनायक यादव,वंचित आघाडीकडून मोहन साबळे यांच्यात लढत होणार आहे. प्रभाग आठ मध्ये अनुसूचित जाती गटातून राष्ट्रवादी कडून संजय कोलप, भाजपकडून दीपक वायदंडे, शिवसेनेकडून महेश सागरे, विनोद सौदी, उद्धवसेनेकडून गटाकडून अभिजित कनिरे, समाजवादी पार्टीतून राजन बालगावकर, वंचित बहुजन आघाडीकडून सतिश सरवदे तर अपक्ष म्हणून संदीप कांबळे, मच्छिंद्रनाथ हेगडे यांच्यात लढत होणार आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस कडून प्रियंका देशमुख, भाजपकडून योगिता राठोड, शिवसेना (शिंदे) गटातून जिजाताई लेंगरे तर अपक्ष कल्पना कोळेकर, उज्ज्वला सुतार यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. सर्वसाधारण महिला गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूनम मोकाशी, भाजपकडून मीनाक्षी पाटील, शिंदेसेनेकडून नीता शिंदे, उद्धवसेनेकडून स्टेपी कनिरे, वंचित बहुजन आघाडीकडून भारती भगत तर अपक्ष म्हणून सपना गायकवाड यांच्यात लढत होणार आहे. सर्वसाधारण गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगरसेवक विष्णू माने भाजपकडून संजय पाटील शिंदेसेनेकडून स्वप्निल औंधकर, समाजवादी पार्टीकडून नितीन मिरजकर, उद्धवसेनेकडून अनिल माने तर अपक्ष सिद्धराम शिंखुनाळे यांच्यात लढत होणार आहे.
५२ जणांची माघारप्रभाग एक - अजिंक्य मोहिते अरुणा परीट, कोमल चव्हाण,प्रियांका विचारे, सायराबानू मुलाणी, राधिका तुपे, अश्विनी पवार, विश्वजित पाटील, प्रमोद देवकाते, सुभाष तुपे, प्रशांत पाटील.प्रभाग दोन - शुभांगी पवार, दाऊद मुजावर, तारिक नायकवडी,पूनम पाटील, ज्योती कोळेकर, रुबिना मुजावर, मनीषा गडदे, प्राजक्ता कोळी, विजय खोत, रमेश पाटील, हिना मालगावे, हमीद तुर्कीप्रभाग आठमधून - आशुतोष धोतरे, छाया सरोदे, सिद्धार्थ माने, दिलीप मोहिते ,मनोज लांडगे, संदीप कामत, प्रथमेश हेगडे, छाया दुधाळ, संगीता नगरकर, जनाबाई वळकुंडे, भाग्यश्री माने, नेत्रा कुरळपकर, सुनिता जगधने, संगीता जाधव, अक्षदा पाटील, प्रतीक्षा पाटील, रेखा पाटील, भारती माने, सोमेश्वरी हुंदरे, सूरज कासलीकर, रवींद्र खराडे, गणेश माने, अश्विन पाटील, सुशांत पाटील, जालिंदर फारने, रंजना बिसले, सुनील भोसले, भालचंद्र मोकाशी, युवराज शिंदे यांनी अर्ज माघार घेतले आहेत.
Web Summary : 52 candidates withdrew from Sangli's Kupwad municipal elections. BJP managed to quell internal rebellion. Three wards signal four-way contests between BJP, NCP factions, and Shinde Sena for twelve seats.
Web Summary : सांगली के कुपवाड नगर निगम चुनाव से 52 उम्मीदवारों ने नाम वापस लिए। बीजेपी आंतरिक विद्रोह को शांत करने में सफल रही। बारह सीटों के लिए बीजेपी, एनसीपी गुटों और शिंदे सेना के बीच चार-तरफ़ा मुकाबले के संकेत।