शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: चाळीस लाखांच्या कर्जाचे ५० लाख व्याज, बलवडीच्या सावकारावरावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 17:12 IST

मुलाच्या आजारपणावरील उपचार, व्यवसायासाठी घेतले होते कर्ज

विटा : मुलाच्या आजारपणावरील उपचार व काजू प्रक्रिया व्यवसायासाठी दरमहा ३ टक्के व्याज दराने घेतलेल्या ४० लाख रुपये कर्जाची निव्वळ व्याजाची रक्कम ५० लाख रुपये केली. त्यानंतर कर्ज आणि व्याज मिळून ९० लाख रुपयांच्या वसुलीसाठी बलवडी (भा.) येथील मनोहर ईश्वर पवार (वय ४५) यांच्याकडे सातत्याने तगादा लावून त्रास दिला. याकरणी गुरुवारी विटा पोलिस ठाण्यात जगन्नाथ दत्तू पवार (रा. बलवडी-भाळवणी, ता.खानापूर) या खासगी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.बलवडी (भा.) येथील मनोहर पवार यांनी मुलाच्या औषधोपचार व काजू प्रक्रिया व्यवसायासाठी कर्ज हवे होते. गावातीलच खासगी सावकार संशयित जगन्नाथ पवार यांच्याकडून ४० लाख रुपये कर्ज दरमहा ३ टक्के व्याज दराने रक्कम जुलै २०१७ ते मे २०२० या कालावधीत वेळोवेळी घेतले होते. त्यापोटी जुलै २०१७ पासून नोव्हेंबर २०१९ पर्यंत मनोहर यांनी जगन्नाथ पवार यांना दरमहा तीन टक्के व्याजदराने २० लाख रुपयांची परतफेड केली.

तरीही संशयित जगन्नाथ पवार यांनी मनोहर यांच्या पलूस येथील घरी पहाटे व बलवडी येथील घरी रात्रीच्या वेळी जाऊन मनोहर यांच्याकडे व्याजाच्या पैशासाठी तगादा लावला होता. त्यानंतर दि. ३० जून २०२३ रोजी जबरदस्तीने जगन्नाथ पवार यांनी मनोहर यांच्या मालकीचे बलवडी (भा.) येथील गट नं. २३० मधील ६७.८७ आर व गट नं. ११३/१ मधील ५९.६८ आर क्षेत्र रक्कम रुपये ९० लाख हे काजू प्रक्रिया व्यवसायासाठी दिल्याबाबत ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करारपत्र/ साठेखत करून घेतले.त्या नोटरीच्या आधारे संशयित जगन्नाथ पवार हा मनोहर यांच्याकडे पैशांबाबत तगादा लावून त्यांना शिवीगाळ व दमदाटी करीत होता. याप्रकरणी मनोहर पवार यांनी गुरुवारी पवार यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी खासगी सावकर पवार याच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९ स बीएनएस कलम ३०८ अन्वये विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस