सांगली जिल्हा बँकेच्या बाज शाखेत ५० लाखांचा अपहार, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू

By अविनाश कोळी | Updated: May 30, 2025 13:37 IST2025-05-30T13:35:43+5:302025-05-30T13:37:44+5:30

Sangli: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाज (ता. जत) शाखेत शाखाधिकारी आणि शिपाईकडून शासकीय निधीतील सुमारे ५० लाखांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

50 lakhs embezzled from Sangli District Bank's Baz branch, investigation initiated by senior officials | सांगली जिल्हा बँकेच्या बाज शाखेत ५० लाखांचा अपहार, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू

सांगली जिल्हा बँकेच्या बाज शाखेत ५० लाखांचा अपहार, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू

- अविनाश कोळी

सांगली  - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाज (ता. जत) शाखेत शाखाधिकारी आणि शिपाईकडून शासकीय निधीतील सुमारे ५० लाखांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या शाखेतील कर्मचाऱ्यांची बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु करण्यात आली असून चौकशीअंती आणखी अपहाराचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बाज येथील शासनाकडून शेतकऱ्यांसाठी आलेल्या अनुदानातील सुमारे ५० लाख इतकी रक्कम तत्कालीन शाखाधिकाऱ्यांनी बँकच्या खात्यावरून स्वतः आणि इतर नातेवाइकांच्या नावे टाकून रकमेचा अपहार केल्याचा प्रकार बँकेच्या तपासणीमध्ये आढळून आला आहे. याप्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँकेच्या मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक जत तालुक्यात तळ ठोकून असून त्यांनी बाज शाखेची दिवसभर तपासणी केली. अपहार प्रकरणातील नियुक्तीस असलेल्या डफळापूर शाखेची ही तपासणी केली जाणार आहे. यामध्ये अपहाराचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता करण्यात येत आहे.

अपहार प्रकरणातील शाखाधिकारी सोलनकर यांचे वडील बँकेचे कर्मचारी होते. त्यानंतर ते शिपाई म्हणून बँकेत नोकरीला लागले. शिपाईचे शाखाधिकारी झाले. मात्र त्यांचा कारभार सतत वादग्रस्त राहिला. यापूर्वी दोन वेळा वादग्रस्त ठरले आहेत. दोन वर्षापूर्वी वरिष्ठ कार्यालयाचा आदेश असतानाही आदेश डावलून ऑनड्यूटी गोवा दौरा केला होता. याप्रकरणी बँकेने त्यांच्यावर कारवाई केली होती. आता अपहार निदर्शनास आल्याने चौकशी सुरु करण्यात आली आहे.

चौकशीअंती अपहाराची रक्कम निश्चित - शिवाजीराव वाघ
जिल्हा बँकेच्या बाज शाखेत अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी बँकेने चौकशी सुरु केली आहे. चौकशीअंती अपहाराची रक्कम निश्चित होईल. त्यानंतर तत्काळ कारवाई केली जाईल, असे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले.

Web Title: 50 lakhs embezzled from Sangli District Bank's Baz branch, investigation initiated by senior officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.