शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

हिवतडमध्ये लांडग्यांच्या हल्ल्यात ४५ मेंढ्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 15:37 IST

हिवतड (ता. आटपाडी) येथे लांडग्यांनी मेंढ्यांच्या काळपावर हल्ला करून ४५ मेंढ्यांचा फडशा पाडला, तर १६ मेंढ्या जखमी केल्या. गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. यात सतीश शेळके (रा. कनेरवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांचे सुमारे सात लाख रुपयांंचे नुकसान झाले.

ठळक मुद्देहिवतडमध्ये लांडग्यांच्या हल्ल्यात ४५ मेंढ्या ठार कनेरवाडीच्या सतीश शेळके यांचे सात लाख रुपयांंचे नुकसान

नेलकरंजी : हिवतड (ता. आटपाडी) येथे लांडग्यांनी मेंढ्यांच्या काळपावर हल्ला करून ४५ मेंढ्यांचा फडशा पाडला, तर १६ मेंढ्या जखमी केल्या. गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. यात सतीश शेळके (रा. कनेरवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांचे सुमारे सात लाख रुपयांंचे नुकसान झाले.सतीश शेळके यांनी कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचे संकट आल्याने आणि सतत पाऊस येत असल्यामुळे हिवतड येथे मेंढ्या चारण्यासाठी आणल्या आहेत. हा मेंढ्यांचा कळप भिवघाट-आटपाडी रस्त्यापासून तीन किलोमीटर अंतरावर कवड्याचा डोंगर परिसरात खांडेकर वस्तीजवळ प्रकाश लक्ष्मण सरगर यांच्या शेतात बसविला होता. गुरूवारी रात्री एक वाजण्याच्या दरम्यान ९ ते १० लांडग्यांच्या कळपाने या मेंढ्यांवर जोरात हल्ला केला.

सतीश शेळके अचानक झालेल्या लांडग्यांच्या हल्ल्याने घाबरून गेले. तरीही आरडाओरड करीत मोठ्या धाडसाने जिवावर उदार होऊन त्यांनी लांडग्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न निष्फळ ठरला. बघता बघता लांडग्यांनी ४५ मेंढ्यांचा फडशा पाडला.

शेळके यांनी मोठ्याने आरडाओरड करून परिसरातल्या लोकांना मदतीसाठी बोलाविले. परिसरातून काही लोक धावत आल्याने बाकीच्या शेळ्या-मेंढ्या बचावल्या. तरीही १६ मेंढ्यांना जखमी करून लांडग्यांचा कळप पसार झाला. रात्रीच्या अंधारामुळे आणि पाऊस पडत असल्याने आजुबाजूच्या शेतकरी बांधवांकडून तातडीने मदत होऊ शकली नाही.हिवतड गावचे सरपंच उमाजी सरगर, माणिकराव देशमुख आणि परिसरातील ग्रामस्थांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने वन विभाग कार्यालयास संपर्क साधून माहिती दिली. शुक्रवारी सकाळी आठ वाजता वन कार्यालयातील क्षेत्रपाल सुप्रिया तीरगावे, वनपाल पी. बी. भालके, वनरक्षक संजय कारे, काका सरगर यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार सचिन लंगोटे आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश चव्हाणही घटनास्थळी दाखल झाले. याचा पंचनामा केला असून जखमी मेंढ्यांवर उपचार करण्यात आले. समाजकल्याण विभागाचे सभापती ब्रम्हानंद पडळकर, पंचायत समिती सदस्य रूपेश पाटील यांनी भेट देऊन, शेळके यांना शासनाची मदत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :wildlifeवन्यजीवSangliसांगलीkolhapurकोल्हापूर