शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मणेराजुरीत द्राक्ष व्यापाऱ्यांचा ४९ लाखाला गंडा, फसवणुकीने द्राक्ष उत्पादक हवालदिल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 15:55 IST

गावातील २१ द्राक्ष बागायतदारांची तब्बल ४९ लाख रुपयांची फसवणूक

तासगाव : मणेराजुरी (ता. तासगाव) येथे पुन्हा एकदा द्राक्ष व्यापाऱ्यांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना गंडा घातला आहे. गावातील २१ द्राक्ष बागायतदारांची तब्बल ४९ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. व्यापारी पसार झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी तासगाव पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. सततच्या फसवणुकीने द्राक्ष उत्पादक हवालदिल झाले आहेत.द्राक्ष हंगाम सुरू झाल्यानंतर मणेराजुरी येथे काही व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांचा गंडा घालून परागंदा झाल्याची एक घटना नुकतीच घडली असताना, गुरुवारी पुन्हा एकदा अशीच दुसरी घटना घडली आहे. गावातील २१ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी एसटीसी एके फ्रुट सप्लायर्स अशा नावाने असलेल्या कंपनीच्या द्राक्ष व्यापाऱ्यांना द्राक्षाची विक्री केली होती. व्यापाऱ्यांनी एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांची द्राक्ष खरेदी केली होती. काही शेतकऱ्यांचे थोडे पैसे दिले होते, तर काही शेतकऱ्यांना लवकरच पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र गुरुवारी हे व्यापारी मुक्कामास असल्याच्या ठिकाणी दिसून आले नाहीत. त्यांचे मोबाईल बंद होते. व्यापारी पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर, फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी तासगाव पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस