शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: नोकरीच्या आमिषाने ४४ लाखांचा गंडा, नागठाणेच्या ठकसेनास कर्नाटकात अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 14:16 IST

रेल्वेमध्ये तिकीट तपासणीस, टीटीई, क्लार्कपदी भरती करण्याचे आमिष

भिलवडी : रेल्वेमध्ये तिकीट तपासणीस, टीटीई, क्लार्कपदी भरती करण्याचे आमिष दाखवून तरुणांना ४४ लाखांचा गंडा घालणाऱ्या नागठाणे (ता. पलूस) येथील ठकसेन मौलाली शौकत मुल्ला यास भिलवडी पोलिसांनी सापळा रचून इंडी (कर्नाटक) येथे अटक केली.भिलवडी पोलीस ठाण्यात १ जुलैरोजी किरण महादेव पवार (रा. आरग, ता. मिरज) व त्याच्या मित्रांनी तक्रार दाखल केली होती. भारतीय रेल्वेमध्ये नोकरीचे आमिष दाखवून मौलाली शौकत मुल्ला व शौकत गुलाब मुल्ला यांनी फसवणूक केल्याचे त्यात म्हटले होते. त्यानुसार दोघा बाप-लेकांविरोधात भिलवडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या तक्रारीवरून भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक कैलास कोडग, एम. एस. मोरे तपास करीत होते. तब्बल एक महिना मुल्ला नागठाणे परिसरातून गायब होता. २९ जुलैरोजी खबऱ्याकडून मौलाली मुल्ला इंडी (जिल्हा विजापूर, राज्य कर्नाटक) येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार भिलवडी पोलिसांच्या पथकाने इंडी येथे जाऊन मौलाली मुल्ला यास शिताफीने पकडले. त्याला अटक केली आहे.पलूस न्यायालयासमोर त्याला ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. त्याने नोकरीचे आमिष दाखवून आणखी कोणाची फसवणूक केली असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी