शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

सांगली जिल्ह्यात ४0 हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 12:16 IST

कर्जमाफी योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात आजअखेर १५ याद्या प्रसिद्ध झाल्या असून, जिल्ह्यातील १ लाख १९ हजार शेतकऱ्यांना २७४ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. अजूनही जिल्ह्यातील ४0 हजारावर शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिले आहेत. यात जिल्हा बँकेचे २५ हजार कर्जदार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात ४0 हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचितशेतकऱ्यांचे लक्ष शासनाच्या निर्णयाकडे

सांगली : कर्जमाफी योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात आजअखेर १५ याद्या प्रसिद्ध झाल्या असून, जिल्ह्यातील १ लाख १९ हजार शेतकऱ्यांना २७४ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. अजूनही जिल्ह्यातील ४0 हजारावर शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिले आहेत. यात जिल्हा बँकेचे २५ हजार कर्जदार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना जाहीर केली होती. योजनेअंतर्गत पात्र असतानाही लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्या कर्जाचा आकडा ३५ कोटी रुपयांच्या घरात आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, कर्जमाफीपासून वंचित असणाऱ्यांना लवकरच न्याय दिला जाईल, अशी घोषणा केल्याने आता या शेतकऱ्यांचे लक्ष शासनाच्या निर्णयाकडे लागले आहे.शेतकऱ्यांचे दीड लाखापर्यंतचे थकीत कर्ज पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील दीड लाखापर्यंत कर्ज असणाऱ्या २९ हजार ९ शेतकऱ्यांचे ११८ कोटी ११ लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले.

दीड लाखापेक्षा अधिक रक्कम थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना एकरकमी परतफेड योजना लागू करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील ३ हजार ४५५ शेतकऱ्यांना ३२ कोटी ३३ लाख रूपयांचा लाभ मिळाला. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील ८७ हजार ३0१ शेतकऱ्यांना १३४ कोटी ३८ लाख रुपयांचा लाभ मिळाला.आजअखेर लाभार्थी शेतकऱ्यांच्या पंधरा याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. तरीही या १५ याद्यांमधून जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. जिल्ह्यातील चाळीस हजार शेतकरी अद्याप वंचित आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली