जिल्ह्यात कोरोनाचे नवे ३८ रुग्ण;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:23 IST2020-12-09T04:23:10+5:302020-12-09T04:23:10+5:30

सांगली : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे ३८ नवे रुग्ण आढळून आले, तर चारजणांचा मृत्यू झाला. दिवसभरात २४ जणांनी कोरोनावर मात ...

38 new corona patients in the district; | जिल्ह्यात कोरोनाचे नवे ३८ रुग्ण;

जिल्ह्यात कोरोनाचे नवे ३८ रुग्ण;

सांगली : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे ३८ नवे रुग्ण आढळून आले, तर चारजणांचा मृत्यू झाला. दिवसभरात २४ जणांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ४५ हजार जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असून, ३७७ जण उपचाराखाली आहेत.

महापालिका क्षेत्रात मंग‌ळवारी ११ रुग्णांची नोंद झाली. यात सांगलीत ९, तर मिरजेत दोन रुग्णांचा समावेश आहे. आटपाडीत ३, खानापूर, जत तालुक्यात प्रत्येकी २, मिरज, शिराळा तालुक्यात प्रत्येकी ५, पलूस, तासगाव तालुक्यात प्रत्येकी एक, तर कडेगाव तालुक्यात सर्वाधिक ८ रुग्ण आढळून आले. वाळवा व कवठेमहांकाळ तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. दरम्यान, सांगली शहर, जत, कडेगाव, वाळवा येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला.

दिवसभरात आरटीपीसीआरच्या ४८६ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ८ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. अँटिजेनच्या १५४७ चाचण्यांत ३० रुग्ण सापडले. सध्या ७२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यात ऑक्सिजनवर ५३, हाय फ्लो नेझल ऑक्सिजनवर ७, नाॅन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर १०, तर इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर २ जण आहे. सध्या जिल्ह्यातील ३७७ व परजिल्ह्यातील १७ जणांवर उपचार सुरू आहेत.

चौकट

मंगळवारी दिवसभरात...

आजचे रुग्ण : ३८

उपचाराखालील रुग्ण : ३७७

आजअखेर बरे झालेले रुग्ण : ४५,०१३

मृत्यू : १७०९

आजअखेरचे एकूण रुग्ण : ४७०९९

चिंताजनक : ७२

Web Title: 38 new corona patients in the district;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.