शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत भरदिवसा घर फोडून ३७ तोळे दागिने लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 15:25 IST

एकूण आठ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला

सांगली : शहरातील गजबजलेल्या टिळक चौकातील घर फोडून चोरट्यांनी तब्बल ३७ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. रोख १० हजारांसह दागिने असा एकूण आठ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. या प्रकरणी सर्वेश मुरलीधर बियाणी (रा. पेठभाग, सांगली) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मंगळवारी दुपारी दोन ते सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील नामवंत कापड व्यापारी म्हणून बियाणी यांची ओळख आहे. टिळक चौकानजीक पेठभाग परिसरात बियाणी बिल्डिंगमध्ये ते राहण्यास आहेत. मंगळवारी दुपारी बियाणी कुटुंबीय कामाच्या निमित्ताने घर बंद करून इचलकरंजी येथे गेले होते. नेमकी हीच संधी साधून चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व आतील लोखंडी कपाटात ठेवलेले दागिने लंपास केले. परतल्यानंतर चोरीचा प्रकार बियाणी यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

हे दागिने पळवले...बियाणी यांच्या घरातून १ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे नेकलेस, ९० ग्रॅमचे कानातील तीन टॉप्सचे सेट, ७० हजारांची २० ग्रॅम सोन्याची चेन, ७० हजारांचा ३५ ग्रॅम सोन्याचा कपाळावरील बोर, १ लाख २० हजारांच्या ६० ग्रॅम चार सोन्याच्या बांगड्या, ७० हजारांचे ३५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, ६० हजारांच्या ५ ग्रॅम सहा सोन्याच्या अंगठ्या, ४० हजारांचे १० ग्रॅमचे दोन वेढण, ५० हजारांची २५ ग्रॅम सोन्याची चेन, ३० हजारांची दोन सोन्याची नाणी, २० हजारांचा दहा ग्रॅम सोन्याचा डाळा, १ लाख १२ हजार ५०० रुपयांचा डायमंड नेकलेस व ४५ ग्रॅम वजनाचा टॉप्स सेट, १० हजार रुपयांची चांदी चोरट्यांनी लंपास केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस