शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सधन सांगली जिल्ह्यात चक्क 'इतकी' कुपोषित बालके, अडीच हजारांवर मुलांचे वजन कमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 18:11 IST

कुपोषणाची वाढती संख्या प्रशासनासमोर चिंता

सांगली : सधन सांगली जिल्ह्यात तब्बल ३२८ तीव्र कुपोषित बालके आढळून आली आहेत. २ हजार ७०६ कमी वजनाच्या बालकांचा समावेश असून, ही स्थिती विचार करण्यास भाग पाडणारी आहे. गर्भवती महिलांसह, बालकांच्या आहारकडे दुर्लक्ष केल्यामुळे कुपोषित बालकांची संख्या वाढत आहे. कुपोषित बालकांचे आरोग्य सुदृढ बनवण्यासाठी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभाग अनेक योजना राबवत आहे. मात्र, याकडे पालकांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रशासन चिंतेत आहे.आदिवासींची संख्या नंदुरबार, गडचिरोली, रायगड जिल्ह्यात जास्त असल्यामुळे तिथे कुपोषित बालकांची संख्या जादा आढळून येत आहे. काहीअंशी आदिवसी पट्ट्यात कुपोषित बालके लक्षणीय संख्येत आढळतात. राज्य पातळीवर कुपोषित बालकांची समस्या दूर करण्यासाठी अनेक योजना कागदोपत्री राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. आदिवासी पट्ट्याबरोबरच सधन अशा सांगली जिल्ह्यातही कुपोषित बालकांची संख्या जास्त आहे. गर्भवती महिलांसह बालकांच्या आहाराकडे दुर्लक्ष केल्याने कुपोषित बालकांची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुपोषित बालकांच्या वजनात व श्रेणीत वाढ होण्यासाठी पोषक आहार दिला जातो. मात्र, आहार दिल्यानंतर तो बालकांना पालकांकडून व्यवस्थित देण्याची गरज आहे. जिल्ह्यातील जत, आटपाडीबरोबरच मिरज, वाळवा अशा अत्यंत सधन भागात सेव्हियर ॲक्यूट माल न्यूट्रिशीयन (सॅम) आणि मॉडरेट ॲक्युट माल न्यूट्रिशीयन (मॅम) बालकांची संख्या विचार करण्यास भाग पाडणारी आहे. तीव्र कमी वजनाची मिरज तालुक्यात १००, जत ५२, वाळवा ५७, तर आटपाडी तालुक्यात २९ बालके आढळली आहेत. कुपोषित बालकांना सुदृढ बनवण्यासाठी ‘व्हीसीडीसी’नुसार पोषण आहार, लसीकरण करून आरोग्य केंद्रातर्फे उपचारही होत आहेत. तरीही दर महिन्याच्या सर्वेक्षणात कुपोषित आणि कमी वजनाची बालके आढळून येत आहेत.

जिल्ह्यातील कुपोषित, कमी वजनाचे बालकेतालुका - तीव्र कमी - कमी वजनाचेक. महांकाळ - १९  - १२८मिरज   -  १००  - ४९९खानापूर   - २६  - २७३जत     -  ५२   -  ५२१वाळवा   -  ५७  -  ३५६पलूस    -  ८   -  २२४तासगाव   -  १६   -  २०९शिराळा   -  ६  -  ११४आटपाडी   -  २९ -  २७४कडेगाव -  १५  -  १९८

गर्भधारणेवेळी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पोषण आहार घेणे आवश्यक आहे. बाळ जन्मानंतर पहिले सहा महिने स्तनपान करणे गरजेचे आहे. सहा महिन्यांनंतर स्तनपानाबरोबरच घरी शिजविलेला ताजा पूरक आहार घेण्याची गरज आहे. तसेच आवश्यकतेनुसार कॅल्शियमच्या गोळ्या घेणे गरजेचे आहे. याबद्दल महिला व बालकल्याण, आरोग्य विभागाकडून जनजागृती होत आहे. -संदीप यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.

टॅग्स :Sangliसांगली