३२ शिराळा नागपंचमी: आख्यायिका अन् जागतिक स्तरावर कशी पसरली कीर्ती.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 04:09 PM2023-08-21T16:09:37+5:302023-08-21T16:10:02+5:30

कोतवाल यांचा मानाचा नाग 

32 Shirala Nagpanchami: The legend and how the fame spread globally Know | ३२ शिराळा नागपंचमी: आख्यायिका अन् जागतिक स्तरावर कशी पसरली कीर्ती.. जाणून घ्या

३२ शिराळा नागपंचमी: आख्यायिका अन् जागतिक स्तरावर कशी पसरली कीर्ती.. जाणून घ्या

googlenewsNext

विकास शहा, शिराळा

नागपंचमीमुळे शिराळा शहराचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. येथे होणाऱ्या जिवंत नागाच्या पूजेमुळे या गावाला 'नागभूमी' म्हणून ओळखले जाते. मात्र सद्या ही नागपंचमी 'न्यायालयात' अडकली आहे. यामुळे समधर्म समभावाचे प्रतीक असणारी ही नागपंचमी शिराळकरांनी स्वतःला अनेक बंधने घालून घेतली आहे. जिवंत नागाची पूजा करण्याचा आपला हक्क पुन्हा मिळेल अशी शिराळकरांना अपेक्षा आहे.

गोरक्षनाथांचे काही काळ या गावाच्या दोन किमी अंतरावर वास्तव्यास होते. दर बारा वर्षांनी नाथ साम्रदाय मेळावा येथे मोठ्या प्रमाणात भरतो.जिवंत नाग पूजा व गोरक्षनाथ यांचा परस्पर संबंध असून याबाबत एक आख्यायिका आहे. सतीचा ओढा व मोरणा नदीच्या संगमावर गोरक्षनाथ यांचे वास्तव होते. त्यावेळी भिक्षा मागण्यासाठी शिराळा गावातील महाजन यांच्या घरी आले. त्या दिवशी नागपंचमी असल्याने नाग पूजा करत असल्याने भिक्षा देण्यास वेळ लागला. त्यामुळे गोरक्षनाथ यांना काही वेळ तिष्ठत उभे राहावे लागले. यावेळी आपण मातीच्या नागाची पूजा करीत होते त्यामुळे मला यायला वेळ लागला असे सांगितले. त्यावेळी आपल्या मंत्राच्या सहाय्याने तिथे जिवंत नाग प्रकट केला व त्या गृहिणीस त्याची पूजा करण्यास सांगितले त्यापासून येथे जिवंत नाग पूजेस सुरुवात झाली. ही घटना बाराव्या शतकातील.

पूर्वी येथील नागपंचमीचे स्वरुप मर्यादित होते. एकदा स्वातंत्र्य सेनानी दत्ताजीराव पोटे यांनी येथिल नागपूजा पाहण्यासाठी शंतनुराव किर्लोस्कर यांना बोलावले. त्यानी येथील नागपंचमी पाहून किर्लोस्कर मासिकात प्रसिद्धी दिली यामुळे नागपंचमीस मोठे स्वरूप प्राप्त होऊन जागतिक स्तरावर कीर्ती पसरली. करवीर निवासनी अंबामाता मूळची शिराळ्याची आहे. या अंबामातेचे प्राचीन मंदिर येथे आहे.

याआधी जिवंत नागाची वाजतगाजत मिरवणूक 

नागपंचमी दिवशी मानाची पालखी काढण्यात येते त्याचबरोबर या अगोदर जिवंत नागाची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येत होती. नागदेवतेचे दर्शन घडावे, नागाबद्दल अंधश्रद्धा दूर व्हाव्यात हा त्यामागचा हेतू. ही नागपंचमी पाहण्यासाठी देश परदेशातून पर्यटक व भाविक येत असत. मात्र वन्यजीव कायद्याच्या आधारे काही नागरिकांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. यामुळे जिवंत नाग पूजा व त्यांची मिरवणूक बंद झाली.

शिराळकराच्यात नाराजी 

यामुळे शिराळकरांनी आपल्यावर अनेक बंधने घालून घेतली यामध्ये बिनविषारी साप पकडून फोटो साठी त्यांचा उपयोग करायचा ही प्रथा बंद केली, मिरवणुकीत नृत्यांगना नाचवणे, नाग स्पर्धा यावर बंधन घालून घेतले. अनेक बंधने स्वतःवर घालून घेतले. मात्र जिवंत नाग पूजा बंद झाल्याने साहजिकच भाविक व शिराळकराच्यात नाराजी पसरली आहे. नागपंचमी कशी साजरी करावी यासाठी समिती स्थापून त्याद्वारे नागपंचमी कशी साजरी करावी याबाबत सूचना दिल्या जातात. नागपंचमी बाबत वेगळा कायदा करून ठराविक दिवसांसाठी वन्यजीव कायद्यातून या गावास सूट मिळावी.असा प्रस्ताव पाठवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

नागपंचमी दिवशी त्याचबरोबर इतर कोणत्याही दिवशी नाग दिसला, जखमी अवस्थेत असणारा नाग आढळला, अडचणीत सापडलेला नाग दिसला तर त्यास न मारता त्याची सुखरूप पणे सुटका करून त्यास सुरक्षित स्थळी सोडले जाते. हे आहे येथील नागरिकांचे नागावरील प्रेम, श्रद्धा.  बाराव्या शतका पासून ही जिवंत नाग पूजेची प्रथा सुरू आहे. एवढी मोठी परंपरा व इतिहास कोणत्या सणाला आहे? मात्र उच्च न्यायालयाचा आदर राखून येथे नागपंचमी साजरी केली जाते. सत्तर पेक्षा जास्त मंडळे, ग्रामस्थ शांततेचा मार्गाने हा सण साजरा करत आहेत.

अशी ही शिराळकरांचा मानबिंदू असणारी , कौशल्य, सर्पमित्र, कला, परंपरा, भावीकता, समधर्म समभाव, अश्या अनेक गोष्टी चे दर्शन घडणारी ही आगळीवेगळी परंपरा आहे. त्याला जोड आहे अनेक ऐतिहासिक पुरातन ग्रंथांची. जिवंत नागाची पूजा व मिरवणूक काढण्यास परवानगी मिळावी हीच ग्रामस्थ, नागमंडळांचे सदस्य व भाविकांची तीव्र इच्छा आहे.

कोतवाल यांचा मानाचा नाग 

नागाच्या मानाची पालखी महाजन यांच्या घरातून निघते. या पालखीतील मूर्ती ही सुमंत पोतदार व पोतदार कुटुंबियांकडून  दिली जाते. मानाचा नाग कोतवाल यांचा असतो.

Web Title: 32 Shirala Nagpanchami: The legend and how the fame spread globally Know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.