शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सातारा, मिरजदरम्यान ३ रेल्वे रद्द, प्रवाशांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 11:56 IST

मिरज : सातारा जिल्ह्यात शिरवडे-कराड-शेणोली विभागात रेल्वे दुहेरीकरणाच्या कामासाठी सोमवार व मंगळवारी तीन रेल्वेगाड्या सातारा व मिरजदरम्यान रद्द करण्यात ...

मिरज : सातारा जिल्ह्यात शिरवडे-कराड-शेणोली विभागात रेल्वे दुहेरीकरणाच्या कामासाठी सोमवार व मंगळवारी तीन रेल्वेगाड्या सातारा व मिरजदरम्यान रद्द करण्यात आल्या. यामुळे सातारा व मिरज जादा एसटी सोडून रेल्वे प्रवाशांना सातारा व मिरज येथे पोहोचविण्यात आले.सातारा व मिरजेत रेल्वेत बसण्यासाठी प्रवाशांचे हाल झाले. कराड जवळ रेल्वे दुहेरीकरणासाठी दि.७ रोजी जोधपूर एक्स्प्रेस मिरज-कुर्डुवाडी- दौंड-पुणे-लोणावळा मार्गे वळवली. यामुळे सातारा येथील प्रवाशांना एसटीने मिरजेला यावे लागले. ८ रोजी मिरजेतून सुटणारी रेल्वे क्रमांक २०४७६ मिरज-बिकानेर एक्स्प्रेस मिरज ते सातारा दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली. ही एक्स्प्रेस मिरजेऐवजी सातारा येथून सोडली. यामुळे या गाडीचे अगोदर आरक्षण केलेल्या प्रवाशांना एसटीने साताऱ्याला जावे लागले. कराड जवळ रेल्वे दुहेरीकरणासाठी ८ रोजी सातारा येथून सुटणारी रेल्वे क्र. ११०२८ सातारा-दादर एक्स्प्रेस सातारा व सांगली दरम्यान अंशतः रद्द केली. सांगलीऐवजी सातारा येथून रेल्वे सुटल्याने प्रवाशांना एसटीने सातारा येथे जावे लागले. रेल्वे प्रशासनाने गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला. मंगळवारी मिरज, सांगलीला जाणाऱ्या बिकानेर - मिरज एक्स्प्रेस गाडीतील प्रवाशांना सातारा एसटी विभागाने एसटी उपलब्ध करून, सातारा रेल्वे स्टेशन येथून एसटीने सांगली, मिरजेला पाठवले.

टॅग्स :SangliसांगलीSatara areaसातारा परिसरrailwayरेल्वे