शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: शेअर मार्केटद्वारे जादा परताव्याच्या आमिषाने पावणेतीन कोटींची फसवणूक, तिघे संशयित ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 12:37 IST

फसवणूक झाली असेल तर संपर्क साधा

सांगली : शेअर मार्केटद्वारे जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून दोन कोटी ८४ लाख ५० हजारांना गंडा घालण्यात आल्याचा अजून एक गुन्हा पिनाॅमिक व्हेंचर अँड एलएलपी कंपनीच्या संचालकांवर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पंकज पाटील, अभिजित जाधव, संतोष घोडके या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर विपुल प्रकाश पाटील याच्यासह अन्य दोघे अद्याप पसार आहेत. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे.जिल्ह्यासह अन्य भागात पिनॉमिक व्हेंचर अँड एलएलपी कंपनीने गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवत पैसे घेतले होते. हे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवून दहा महिन्यांत दीडपट परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. आतापर्यंत या कंपनीच्या संचालकांवर २२ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या तक्रारी दाखल आहेत.सांगली शहरातील एका व्यापाऱ्याने जुलै ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत दोन कोटी ८४ लाख ५० हजारांची रक्कम या कंपनीत जादा परताव्याच्या अपेक्षेने गुंतवली होती. दहा महिन्यांनंतर दीडपट रक्कम व टीडीएस नको असल्यास रोखीने पैसे देणार असल्याचेही संशयितांनी सांगितले होते. मात्र, त्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. त्यानंतर रविवारी कंपनीच्या संचालकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यात तीन संशयितांना ताब्यात घेतले. सर्वांना आज, सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर कंपनीचा संचालक विपुल पाटीलसह अन्य अद्यापही पसार आहेत.फसवणूक झाली असेल तर संपर्क साधापिनॉमिक व्हेंचर अँड एलएलपी या कंपनीकडून फसवणूक झाल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अजूनही कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तक्रारींची दखल घेऊन फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस