शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जनकल्याण पतसंस्थेला पावणेतीन कोटीचा गंडा घालणाऱ्या दाम्पत्यासह मुलीला अटक, पाच दिवस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 18:27 IST

संबंधितांनी बोगस जमिनीची बनावट कागदपत्रे सादर करून घातला गंडा

मिरज : जमिनीची बनावट कागदपत्रे सादर करून कराड येथील जनकल्याण पतसंस्थेला तब्बल दोन कोटी ७० लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार सुनील गणेश परांजपे (वय ५५), पत्नी सुचिता सुनील परांजपे (५०), मुलगी पूर्वा सुनील परांजपे ( २५, रा. खरे हाैसिंग सोसायटी सांगली) या तिघांना गांधी चाैक पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने तिघांनाही शनिवारपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.सुनील परांजपे, सुचेता परांजपे व पूर्वा परांजपे या तिघांनी महावीर हुळ्ळे याच्याशी संगनमत करून जनकल्याण पतसंस्थेला मिरजेत सिध्दिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटलच्या पाठीमागे जमीन असल्याचे खोटे सांगून पंढरपूर रस्त्यावरील जमिनीची बनावट कागदपत्रे सादर केली. या जमिनीवर पावणेतीन कोटी रुपये कर्ज उचलले. संबंधितांनी कर्जाची परतफेड केली नसल्याने पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर संबंधित कर्जदार तारण ठेवलेल्या जमिनीचे मूळ मालक नसल्याचे आढळले. सुनील परांजपे याच्या विश्रामबाग येथील जमिनीवर ७५ लाख रुपये कर्जाचा बोजा चढविला असताना दिव्या आहुजा, प्रियदर्शनी वाघ, सच्चानंद आहुजा, महेश ओझा, सचिन दणाणे, आण्णासो चौगुले व सीमा परमार यांनी या मिळकतीची बेकायदा खरेदी व साठेखत केल्याचे आढळले.त्यामुळे संबंधितांनी बोगस जमिनीची बनावट कागदपत्रे सादर करून जनकल्याण पतसंस्थेला दोन कोटी ७० लाख रुपयांचा गंडा घातल्याचे लक्षात येताच पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक कृष्णराव फडके यांनी ॲड. बिल्किस शेख यांच्यामार्फत मिरज न्यायालयात फसवणुकीची फिर्याद दिली. न्यायालयाच्या आदेशाने चार महिन्यांपूर्वी महात्मा गांधी चौक पोलिसात सुनील गणेश परांजपे, त्याची पत्नी सुचेता सुनील परांजपे, मुलगी पूर्वा सुनील परांजपे, महावीर बाबासो हुळ्ळे यांच्यासह कर्जबोजा असलेली मिळकत विकत घेणाऱ्या दिव्या रमेश आहुजा, प्रियदर्शनी अभिषेक वाघ, सच्चानंद मोहनलाल आहुजा, सचिन आण्णासाहेब दणाणे, आण्णासा चौगुले, सीमा गिरीश परमार व उत्तम लक्ष्मण पाटील अशा १२ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल झाल्यानंतर सुनील परांजपे व त्याच्या कुटुंबीयांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे यांनी परांजपे दांपत्यासह मुलीस पुण्यातून अटक केली. परांजपे याचा साथीदार महावीर हुळ्ळे यास न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन दिला आहे.

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी