जिल्ह्यातील २९१ पोलिसांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:25 IST2021-08-01T04:25:06+5:302021-08-01T04:25:06+5:30

सांगली : कोरोना संसर्ग आणि पोलिसांवर वाढलेला बंदोबस्ताचा ताण यामुळे जिल्ह्यातील बदलीस पात्र पोलिसांना दिलासा देत समुपदेशनाव्दारे पोलिसांच्या बदल्या ...

291 police transfers in the district | जिल्ह्यातील २९१ पोलिसांच्या बदल्या

जिल्ह्यातील २९१ पोलिसांच्या बदल्या

सांगली : कोरोना संसर्ग आणि पोलिसांवर वाढलेला बंदोबस्ताचा ताण यामुळे जिल्ह्यातील बदलीस पात्र पोलिसांना दिलासा देत समुपदेशनाव्दारे पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी स्वत: सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत ही प्रक्रिया पूर्ण केली. जिल्ह्यातील २९१ पोलिसांची या प्रक्रियेतून बदली करण्यात आली आहे.

बदली झालेल्या कर्मचाऱ्यांत सहायक पोलीस फौजदार ३४, हेड कॉन्स्टेबल ८४, पोलीस नाईक ९१, शिपाई ९२ अशा एकूण २९१ जणांच्या बदल्या करण्यात आल्या. कोरोनाविषयक नियमांचे काटेकोर पालन करून प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या.

अंमलदार यांनी दिलेल्या तीन पसंतीक्रमांचा विचार करून बहुतांश अंमलदार यांची बदली करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यात आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे. ही प्रक्रिया करताना अधीक्षकांनी सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व म्हणणे ऐकून घेेत ही प्रक्रिया केल्याने कर्मचाऱ्यांनीही समाधान व्यक्त केले.

Web Title: 291 police transfers in the district