सांगली महापालिका क्षेत्रात होम आयसोलेशनमधील २६३० रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 14:50 IST2020-09-05T14:48:40+5:302020-09-05T14:50:35+5:30
गेल्या दोन महिन्यात महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढली. लक्षणे नसलेल्या रुग्णांना प्रशासनाने होम आयसोलेशन केले होते. त्यातील २ हजार ६३० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.

सांगली महापालिका क्षेत्रात होम आयसोलेशनमधील २६३० रुग्ण कोरोनामुक्त
सांगली : गेल्या दोन महिन्यात महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढली. लक्षणे नसलेल्या रुग्णांना प्रशासनाने होम आयसोलेशन केले होते. त्यातील २ हजार ६३० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.
कापडणीस म्हणाले, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या, पण लक्षणे नसलेल्या रुग्णांना प्रशासनाने होम आयसोलेशन हा चांगला पर्याय दिला आहे. घरात स्वतंत्र खोली व स्वतंत्र स्वच्छतागृह असलेल्या रुग्णांना होम आयसोलेशन करण्यात आले. आजअखेर २६३० पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे लक्षणे नसलेल्या रुग्णांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.
अशा रुग्णांनी फॅमिली डॉक्टरांकडून दैनंदिन तपासणी करून घ्यावी अथवा महापालिकेच्या वैद्यकीय पथकाशी संपर्क करावा. लक्षणे जाणवताच तात्काळ महापालिकेचे आरोग्य केंद्र अथवा कोविड रुग्णालयात जावे. होम आयसोलेशनची व्यवस्था नसलेल्या रुग्णांनी कोविड केअर सेंटरचा पर्याय स्वीकारावा. विनाकारण कोविड रुग्णालयात या रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारल्यास गरजूंना बेड मिळेल आणि त्यांचा जीव वाचेल, असेही कापडणीस म्हणाले.
रुग्णांची सद्यस्थिती
- एकूण रुग्ण : ४३८०
- बरे झालेले रुग्ण : २६३०
- उपचाराखाली : १७८८