शिवप्रताप मल्टीस्टेटचा २६० कोटींचा व्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:27 IST2021-04-07T04:27:35+5:302021-04-07T04:27:35+5:30
विटा : कोरोनाकाळात मंदी असतानाही विटा येथील शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेने मार्चअखेर आर्थिक वर्षात २६० कोटी रुपयांचा व्यवसाय केला असल्याची ...

शिवप्रताप मल्टीस्टेटचा २६० कोटींचा व्यवसाय
विटा : कोरोनाकाळात मंदी असतानाही विटा येथील शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेने मार्चअखेर आर्थिक वर्षात २६० कोटी रुपयांचा व्यवसाय केला असल्याची माहिती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव साळुंखे यांनी दिली. यावेळी त्यांनी संस्थेच्या ठेवीत ३० कोटी तर कर्जात २५ कोटी रुपयांची वाढ झाल्याचेही सांगितले.
साळुंखे म्हणाले, सभासदांचा संस्थेवर असलेला विश्वास अधिक दृढ होत असून कर्मचाऱ्यांचे परिश्रम आणि संचालक मंडळ करत असलेला गतिमान कारभार यामुळे संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे. गेल्या वर्षीपासून कोरोनाची महामारी सुरू असतानाही संस्थेने दोन पावले पुढे राहून सभासदांना आपला व्यवसाय पुन्हा उभारण्यासाठी तातडीचे कर्ज वाटप करून त्यांना सहा महिन्यांची हप्ता आणि व्याज भरण्यास सवलत दिली आहे. व्याजदरात ३ टक्के कपात करून अर्थव्यवस्था गतिमान करण्याचे काम केले आहे.
यावेळी कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे यांनी संस्थेच्या सांपत्तिक स्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी गेल्या चार वर्षांत अनेक संकटे आली असतानाही या परिस्थितीला धैर्याने सामोरे जाऊन सभासदांच्या दृढ विश्वासामुळे व्यवसाय वाढीत यशस्वी झालो आहे. यापुढील काळात ठेवी आणि कर्जावरील व्याजदर कमी करावे लागणार आहेत. कर्जावरील व्याजदर कमी झाल्यानंतर अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे सांगितले.
यावेळी उपाध्यक्ष हणमंतराव सपकाळ, कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे, संचालक आलम पटेल, सुरेखा जाधव, सीताराम हारुगडे, गोपाळ तारळेकर, शिवाजी माने यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
फोटो - ०६०४२०२१-विटा-प्रतापराव साळुंखे, विटा.
फोटो - ०६०४२०२१-विटा-विठ्ठलराव साळुंखे, विटा.