शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांची निवडणूक अन् वाजू लागले वादाचे नगारे; एकनाथ शिंदेंवर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
मविआची चार लाख मते कुजवण्याची रणनीती; विरोधकांना संधीच न देण्याची भाजपा-शिंदेसेनेची खेळी
3
राज्यात उदंड झाली फार्मसी कॉलेज, १० महाविद्यालयांमध्ये शून्य प्रवेश; रिक्त जागांमधील वाढ चिंताजनक
4
ज्येष्ठ शिवसैनिकांची फौज उद्धवसेनेसाठी मैदानात; निवडणुकीसाठी मतदार यादीचीही पडताळणी
5
Video: आमदार नीलेश राणेंनी केलं 'स्टिंग ऑपरेशन'; भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात पैशांची बॅग
6
‘ऑपरेशन सिंदूर’मधील शहीद जवानाच्या आईची हायकोर्टात याचिका; "अग्निवीर योजना भेदभावपूर्ण अन्..."
7
‘फ्रायडे फिअर’ने इच्छुकांना ‘फिव्हर’; सर्वोच्च न्यायालयाच्या सुणावणीकडे सर्वांचे लक्ष
8
९१ बिबटे पिंजऱ्यात, पण ते सोडायचे कोठे?; वनविभागापुढे पेच, सर्व रेस्क्यू सेंटरसह टीटीसी फुल
9
राणी बागेतील ‘शक्ती’चा संशयास्पद मृत्यू; काहीतरी लपवण्याचा प्रयत्न, प्राणीप्रेमींचा गंभीर आरोप
10
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
11
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
12
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
13
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
14
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
15
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
16
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
17
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
18
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
19
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
20
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
Daily Top 2Weekly Top 5

Municipal Election: सांगली महापालिका क्षेत्रात २५ हजार दुबार मतदारांना द्यावे लागणार हमीपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 17:13 IST

प्रारूप मतदार यादी : निवडणूक विभागाकडून तयारी; एकाच ठिकाणी होणार मतदान

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत २४ हजार ६४४ दुबार मतदारांची नावे असल्याचे समोर आले आहे. या दुबार मतदारांना मतदानापूर्वी हमीपत्र लिहून द्यावे लागणार आहे. त्या दृष्टीने निवडणूक विभागाकडून तयारी सुरू झाली आहे. दुबार मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे.महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली. २०१८ मध्ये निवडणुकीवेळी महापालिकेची मतदार संख्या ४ लाख २४ हजार १७९ इतकी होती. यंदा त्यात ३० हजार २४९ ने वाढ होऊन ४ लाख ५४ हजार ४२८ झाली आहे. प्रत्येक प्रभागात २१ ते २७ हजार मतदार आहेत. प्रारूप मतदार यादीत २४ हजार ६४४ दुबार नावे आहेत. या नावांसमोर स्टार करण्यात आले आहेत. या मतदारांकडून मतदानापूर्वी हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे.

तसेच पहिल्या टप्प्यात दुबार नावाची यादी प्रसिद्ध करण्याची तयारी सुरू आहे. त्यानंतर प्रत्यक्ष दुबार मतदारांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यांना कोणत्या ठिकाणी मतदान करणार, अशी विचारणाही केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने नियोजन हाती घेतले आहे.

प्रारूप यादीत अनेक त्रुटीमतदार यादीत अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. स्थलांतरित नागरिक, चुकीचे पत्ते, मृत व्यक्तींची नावे कायम राहणे, एकाच मतदाराचे दोन किंवा अधिक ठिकाणी नाव असणे अशा अनेक त्रुटी मतदार यादीत दिसून येत आहेत.

प्रभाग १, ४ मध्ये सर्वाधिक दुबार नावेमहापालिका क्षेत्रात २० प्रभाग आहेत. त्यापैकी प्रभाग १ मध्ये १,६२५ व प्रभाग ४ मध्ये १,६०१ सर्वाधिक दुबार मतदार आहेत. तर मिरजेतील प्रभाग सहामध्ये सर्वांत कमी ७७० दुबार नावे आहेत.

इच्छुकांना भुर्दंडप्रारूप मतदार यादी १५०० ते २००० पानांची आहे. या यादीसाठी इच्छुक उमेदवारांना साडेतीन ते चार हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यात यादीतील अनेक पानांवर एक अथवा दोनच मतदारांची नावे आहेत. त्यामुळे इच्छुकांच्या खिशाला कात्री लागली आहे.

मतदार यादीचा कार्यक्रममतदार यादीवर हरकती व सूचनांसाठी दि. २७ नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे. त्यानंतर ५ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. मतदान केंद्राच्या ठिकाणी ८ डिसेंबर रोजी यादी प्रसिद्ध होईल आणि केंद्रनिहाय मतदार यादी १२ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर दुबार मतदारांची तपासणी व अर्ज घेणे सुरू केले जाणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.प्रभाग निहाय दुबार मतदारसंख्याप्रभाग - मतदार१- १,६२५२- १,१६२३- ९६८४- १,२४३५- १,०१४६- ७७०७- ९९९८- १,३१४९- १,५१३१०- १,२७८११- १,३८६१२- १,१२५१३- १,१६९१४- १,५१३१५- १,४०२१६- १,६०११७- १,२५४१८- १,०७४१९- १,२२३२०- १,०११पुरुष १२,७४७महिला ११,८९५एकूण- २४,६४४

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: 25,000 Duplicate Voters to Submit Affidavit Before Corporation Election

Web Summary : Sangli Municipal Corporation identifies 24,644 duplicate voters in draft list. These voters must submit affidavits before elections. The administration prepares to publish duplicate names and verify voter intentions. Ward 1 and 4 have the most duplicates. Final voter list releases December 5th.