कोविशिल्ड लसीचे २५ हजार डोस आले, आज लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:32 IST2021-07-07T04:32:03+5:302021-07-07T04:32:03+5:30
सांगली : कोविशिल्ड लसीचे २५ हजार डोस सोमवारी रात्री उशिरा जिल्हा परिषदेला मिळाले. त्यामुळे आज, मंगळवारी जिल्हाभरात लसीकरण सुरू ...

कोविशिल्ड लसीचे २५ हजार डोस आले, आज लसीकरण
सांगली : कोविशिल्ड लसीचे २५ हजार डोस सोमवारी रात्री उशिरा जिल्हा परिषदेला मिळाले. त्यामुळे आज, मंगळवारी जिल्हाभरात लसीकरण सुरू राहणार आहे. लस संपल्याने रविवारपासून लसीकरण ठप्प झाले होते.
शुक्रवारी ५८ हजार डोस आल्यानंतर सर्वत्र वेगाने लसीकरण झाले. सुमारे २२५ हून अधिक केंद्रांवर लस देण्याचे काम सुरू होते. पहिल्या दिवशी ४१ हजार आणि दुसऱ्या दिवशी २० हजार जणांना लस देण्यात आली. रविवारी व सोमवारी मात्र लसीअभावी लसीकरण बंद राहिले. सोमवारी रात्री उशिरा लस आल्यानंतर मंगळवारी पुन्हा लसीकरण सुरू राहणार असल्याचे लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनी सांगितले. महापालिकेची सर्व शहरी आरोग्य केंद्रे, ग्रामिण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये लस दिली जाईल. १८ वर्षांवरील सर्वांना लस मिळणार आहे. ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना दुसऱ्या डोसला प्राधान्य असेल.
चौकट
ऑनलाईन लसीकरणासाठी
ऑनलाईन नोंदणीसाठीचे पोर्टल लस आल्याच्या रात्री ८ वाजता कार्यान्वित होते. त्यामुळे लाभार्थ्यांनी पावणेआठपासूनच पोर्टल सुरू करून राहावे. आपला वयोगट, कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन, विनाशुल्क लस, आदी माहिती भरून सज्ज राहावे. जिल्हाभरातील लसीकरण केंद्रांवरील सेशन्स टप्प्याटप्प्याने सुरू होतात. आपल्याला जवळचे व सोयीचे केंद्र निवडावे. ५० टक्के नोंदणी ऑनलाइन स्वरूपात, तर ५० टक्के थेट केंद्रावर केली जाते.