कामेरीत आठवडाभरात २४ रुग्णांची नाेंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:18 IST2021-06-21T04:18:48+5:302021-06-21T04:18:48+5:30
गेल्या आठवडाभरातील लॉकडाऊनमुळे कमी होत आहे. १३ ते ३० जूनअखेर अँटिजन टेस्टमध्ये वाढ करूनही आठ दिवसांत फक्त २४ ...

कामेरीत आठवडाभरात २४ रुग्णांची नाेंद
गेल्या आठवडाभरातील लॉकडाऊनमुळे
कमी होत आहे. १३ ते ३० जूनअखेर अँटिजन टेस्टमध्ये वाढ करूनही आठ दिवसांत फक्त २४ जण कोरोनाबाधित झाले, तर ४० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
गावात २० जूनअखेर ४५३ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यातील ३९० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ५३ रुग्ण उपचाराखाली आहेत. त्यांचावर गृहविलगीकरण व संस्थात्मक विलगीकरणात उपचार सुरू आहेत. १० जणांचा मृत्यू झाला आहे. कामेरीत रविवारी ६० जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. यापैकी दाेघांना काेराेनाची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिवटे यांनी दिली.
कामेरीत सोमवार, दि. २१ जूनअखेर लॉकडाऊन आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची जागीच काेराेना चाचणी घेतली जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राने रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची चाचणी सुरू केली आहे. दक्षता समितीनेही गृहविलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणास प्राधान्य दिले आहे. पोलिसांकडूनही दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या सामूहिक प्रयत्नांना यश येऊन गावातील बाधित रुग्णांची संख्या कमी हाेत आहे. ग्रामस्थांनी कोरोनाचे नियम पाळावेत, मास्कशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन ग्रामपंचायत, दक्षता समिती, पोलीस व आरोग्य विभागाने केले आहे.