पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कासेगाव पोलिसांचा २४ तास पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:26 IST2021-05-10T04:26:06+5:302021-05-10T04:26:06+5:30

कासेगाव येथे सांगली-सातारा सरहद्दीवर पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे प्रताप बडेकर लोकमत न्यूज नेटवर्क कासेगाव : पुणे-बंगलोर ...

24-hour patrol of Kasegaon police on Pune-Bangalore National Highway | पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कासेगाव पोलिसांचा २४ तास पहारा

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कासेगाव पोलिसांचा २४ तास पहारा

कासेगाव येथे सांगली-सातारा सरहद्दीवर पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे

प्रताप बडेकर

लोकमत न्यूज नेटवर्क

कासेगाव : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सांगली-सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कासेगाव पोलिसांचा २४ तास जागता पहारा सुरू आहे. या ठिकाणी चेकपोस्ट उभारले असून ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस कर्मचारी वर्ग आपले काम चोखपणे पार पाडत आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रसाराने राज्य सरकारने सर्वत्र कडकडीत लॉकडाऊन जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सांगली-सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवर कासेगाव (ता.वाळवा) येथे कासेगाव पोलिसांचा २४ तास खडा पहारा सुरू आहे. या महामार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ सुरू असते. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची व त्याच्या कागदपत्रांची कसून तपासणी कासेगाव पोलिसांकडून केली जात आहे. संशयास्पद व नियम मोडणाऱ्या विरोधात कठोर कारवाई केली जात आहे. आतापर्यंत शेकडो वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. काहींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सांगली-सातारा जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून चौकशी व तपासणी करूनच ते वाहन पुढे सोडण्यात येत आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनीही या चेकपोस्टला भेट देऊन कासेगाव पोलिसांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे.

चौकट----

या चेकपोस्टवर कासेगाव पोलिसांची २४ तास गस्त सुरू आहे. पोलीस ठाण्याला अपुरा कर्मचारी वर्ग असला तरी सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मत्ते यांनी मोठ्या कुशलतेने कासेगाव व परिसरातील इतर गावांवर आपल्या कार्याने वेगळीच छाप पाडली आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना चांगलाच धडा मिळत आहे.

Web Title: 24-hour patrol of Kasegaon police on Pune-Bangalore National Highway