शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
2
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
3
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
4
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
5
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
6
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
7
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
8
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
9
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
10
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
11
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
12
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
13
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
14
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
17
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
18
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
19
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
20
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 

Sangli: शासकीय निवासी शाळेतील २३ विद्यार्थ्यांना विषबाधा, विटा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 13:20 IST

विटा : येथील साळशिंगे रस्त्यावरील शासकीय निवासी शाळेतील २३ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली असून, त्यांच्यावर विटा ग्रामीण रुग्णालयात उपचार ...

विटा : येथील साळशिंगे रस्त्यावरील शासकीय निवासी शाळेतील २३ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली असून, त्यांच्यावर विटा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.विटा येथे समाजकल्याण विभागाची शासकीय निवासी शाळा आहे. तेथे ९३ विद्यार्थी आहेत. रविवारी त्यांना दुपारी मांसाहारी जेवण व सायंकाळी दूध व कलिंगड असा आहार दिला. रात्री चपाती, आमटी व भात असे जेवण देण्यात आले. त्यानंतर त्यांना रात्री उशिरा जुलाब आणि उलट्या होउ लागल्या. सोमवारी सकाळी या प्रकारात वाढ झाली. पोटदुखीही सुरू झाली. त्यामुळे त्यांना अन्नातून विषबाधेची शंका आल्याने शाळा प्रशासनाने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.रुग्णालयात तातडीने उपचार सुरू केले. याची माहिती मिळताच आमदार सुहास बाबर यांनी रुग्णालयास भेट दिली. विद्यार्थ्यांवर व्यवस्थित उपचार करण्याच्या सूचना डॉक्टरांना दिल्या. विषबाधेच्या कारणाचा शोध सुरु असून शाळा प्रशासन व जेवण तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु आहे. विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद पोलिसांत झालेली आहे.बाधित विद्यार्थी : सूरज प्रकाश जाधव (वय १६), श्रवणकुमार विठ्ठल बागडे (वय १७), सूरज किसन साठे (वय १५), आदित्य आनंदा रोकडे (वय १६), निर्मल किशोर सावंत (वय १४), स्मित सुभाष झिमरे (वय १२), योगेश बिरुदेव मोटे (वय १३), शुभम प्रकाश माळवे (वय १४), तेजस सचिन काटे (वय १५), आदित्य कैलास लोखंडे (वय १६), आरुष संजय सकट (वय १२),

यश विजय सकट (वय १२), श्रीवर्धन प्रवीण माने (वय ११), प्रज्ज्वल शशिकांत शिंदे (वय १६), सिद्धार्थ जित्ताप्पा बनसोडे (वय १३), आयुष नामदेव सावंत (वय १३), संदीप सुदर्शन नातपुते (वय १४), प्रणव सूर्यकांत उबाळे (वय १६), सक्षम तानाजी चंदनशिवे (वय १२), अभिषेक गौतम डोळसे (वय १२, सर्व रा. विटा), तन्मय प्रकाश निकाळजे (वय १४, रा. निमसोड), अक्षय दिनकर सुखदेव (वय १४, रा. आळते), चैतन्य शशिकांत शिंदे (वय १२), हर्षवर्धन सुनील गायकवाड (वय १३, रा. खेराडे).

टॅग्स :Sangliसांगलीfood poisoningअन्नातून विषबाधाStudentविद्यार्थीhospitalहॉस्पिटल