शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील कारखान्यांकडे २०३ कोटींची एफआरपी थकीत, शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी नाहीच

By अशोक डोंबाळे | Updated: February 25, 2023 17:52 IST

एफआरपीच्या निर्णयाला केराची टोपली

अशोक डोंबाळेसांगली : जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांपैकी चक्क नऊ कारखान्यांनी शेतकऱ्यांना १०० टक्के एफआरपी दिली आहे. पण, चार कारखान्यांकडे चक्क २०३ कोटी ५३ लाख ७१ हजार रुपयांची एफआरपी थकीत आहे. या कारखान्यांनी एफआरपीचे टप्पे केल्याचे दिसत असून एकरकमी एफआरपीच्या निर्णयाला केराची टोपली दाखविल्याचे दिसत आहे.चालू गळीत हंगामातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याकडे दुर्लक्ष केले आहे. या साखर कारखान्यांचा अहवाल साखर आयुक्तालयाने १५ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रसिद्ध केला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांपैकी चक्क नऊ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे.

वाळव्यातील हुतात्मा, कुंडल येथील क्रांती, सांगली येथील (वसंतदादा कारखाना) दत्त इंडिया आणि राजेवाडी येथील श्री श्री शुगर या कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे २०३ कोटी ५३ लाख रुपयांची एफआरपी थकीत आहे. या कारखान्यांकडून १०० टक्के एफआरपी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

शंभर टक्के एफआरपी दिलेले कारखानेजिल्ह्यातील राजारामबापू युनिट साखराळे, वाटेगाव, कारंदवाडी, तिप्पेहळ्ळी, पतंगराव कदम, विश्वासराव नाईक, मोहनराव शिंदे, दालमिया शुगर आणि उदगिरी शुगर या कारखान्यांनी एकरकमी १०० टक्के एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. यामुळे या कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी कारखाना व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत.

जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे. पण, क्रांती, हुतात्मा, दत्त इंडिया, श्री श्री शुगर या कारखान्यांनी एफआरपी थकीत ठेवली आहे, हे योग्य नाही. या कारखान्यांनी तातडीने थकीत सर्व एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली पाहिजे. अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल. - संदीप राजोबा, कार्याध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

 

थकीत एफआरपी असलेले कारखानेकारखाना - थकीत रक्कम

  • हुतात्मा - ३३.३३ कोटी
  • दत्त इंडिया - ७२.२८ कोटी
  • क्रांती - ५५.४१ कोटी
  • श्री श्री शुगर - ४२.३६ कोटी
  • एकूण - २०३.३८ कोटी
टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने