सांगली : वारणा नदीत सापडला वीस किलोचा मासा, मासा अस्थिमत्स्यांच्या सायप्रिनिड कुळातील कटला वंशाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 15:35 IST2018-01-09T15:33:03+5:302018-01-09T15:35:57+5:30
बागणी (ता. वाळावा) येथील सागर जयवंत आपटे व आकाश जयवंत आपटे यांच्या जाळ्यात तब्बल २० किलोचा कटला जातिचा मासा सापडला. अस्थिमत्स्यांच्या सायप्रिनिड कुळातील कटला वंशाचा हा मासा कार्प नावाने ओळखल्या जाणार्या मास्यांच्या समुहातील आहे.

सांगली : वारणा नदीत सापडला वीस किलोचा मासा, मासा अस्थिमत्स्यांच्या सायप्रिनिड कुळातील कटला वंशाचा
बागणी : बागणी (ता. वाळावा) येथील सागर जयवंत आपटे व आकाश जयवंत आपटे यांच्या जाळ्यात तब्बल २० किलोचा कटला जातिचा मासा सापडला.
बागणी येथील भोई समाज वारणा नदीमध्ये परंपरागत मासेमारीचा व्यवसाय करतात. रविवारी सागर व आकाश नेहमीप्रमाणे मासेमारीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या जाळ्यात तब्बल २० किलोचा कटला जातीचा मासा सापडला.
अस्थिमत्स्यांच्या सायप्रिनिड कुळातील कटला वंशाचा हा मासा कार्प नावाने ओळखल्या जाणाऱ्या मास्यांच्या समुहातील आहे. महाराष्ट्रात याला तांबर, तर काही ठिकाणी कटला असे म्हणतात.
कटला हा मासा गोड्या पाण्यात आढळतो. मध्यंतरी ही मास्याची जात दुर्मिळ होत चालली होती. परंतु, मत्स संवर्धनामुळे हल्ली बहुतांशी ठिकाणी हे मासे आढळून येत आहेत. कटला मासे पुरा दरम्यान धरणातून नदीत येतात. मासा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी झाली होती.