शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

मागणीअभावी दररोज २ लाख लिटर दूध अतिरिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:18 IST

मिरज : दुधाला मागणी नसल्याने जिल्ह्यात दररोज सुमारे २ लाख लिटर अतिरिक्त दुधाची समस्या आहे. अनलाॅक काळात निर्बंधामुळे ...

मिरज : दुधाला मागणी नसल्याने जिल्ह्यात दररोज सुमारे २ लाख लिटर अतिरिक्त दुधाची समस्या आहे. अनलाॅक काळात निर्बंधामुळे मोठ्या शहरात हॉटेल, रेस्टाॅरंटसह मिठाई व आईस्क्रिम निर्मितीसाठी मागणी घटल्याने दुधाचा खप कमी आहे. जिल्ह्यात प्रतिदिन १२ लाख लिटर दूध उत्पादनापैकी २ लाख लिटर शिल्लक दुधाची पावडर निर्मिती करण्यात येत आहे.

लॉकडाऊन व बाजारपेठांवरील निर्बंधांमुळे दुधाच्या मागणीत घट झाली आहे. हॉटेल, रेस्टाॅरंट, मिठाई, आईस्क्रिम व उपपदार्थांची विक्री घटल्याने मागणी कमी होऊन अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातून दररोज पाच ते सहा लाख लिटर दुधाची मुंबई व पुण्यात निर्यात होते. दोन महिने लाॅकडाऊन काळात मोठ्या शहरात दुधाची मागणी निम्म्यावर होती. लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतरही बाजारपेठांवर निर्बंध असल्याने दूध शिल्लक राहात आहे. खप कमी झाल्याने अतिरिक्त दुधाची समस्या निर्माण झाली आहे. जिल्ह्यात नदीकाठावरील चार तालुक्यांतच मोठ्या संख्येने दूध उत्पादन हाेते. दैनंदिन १२ लाख लिटर दूध संकलनापैकी ६० टक्के गायीचे दूध आहे. दुधाचा खप कमी असल्याने खासगी व सहकारी दूध डेअऱ्या मोठ्या प्रमाणात दूध पावडर व उपपदार्थ निर्मिती करीत आहेत. मार्चपर्यंत दैनंदिन उत्पादनापैकी दूधपावडर निर्मिती केवळ १० टक्क्यावर होेती; मात्र गेले दोन महिने २० टक्के दुधाची पावडर निर्मिती सुरू आहे. मार्चपासून दूध व्यवसायाला कोरोना आपत्तीचा फटका बसला आहे. त्यानंतर आता पावसाळ्यात दुधाचे उत्पादन वाढत आहे, मात्र मागणी वाढलेली नाही. गतवर्षी लाॅकडाऊन काळात राज्यातील अतिरिक्त दुधाच्या नियोजनासाठी शासनाने प्रतिदिन १० लाख लिटर दूध खरेदी करून अतिरिक्त दुधाची महानंद डेअरीत पावडर निर्मिती केली होती. मात्र यावर्षी अतिरिक्त दुधाची शासनाने खरेदी केली नसल्याने दूध पावडर निर्मिती सुरू आहे. जिल्ह्यात १२ खासगी, ७ सहकारी व १७ मल्टिस्टेट संघ दूध संकलन करतात. त्यापैकी खासगी डेअऱ्यांचे दररोज ७ लाख ५० हजार लिटर दूध संकलन आहे.

चौकट

दरराेज दाेन लाख लिटर दुधाची पावडर

दररोज होणाऱ्या दुग्ध उत्पादनापैकी ५० टक्के दुधाची पिशवीबंद विक्री होते. उर्वरित दुधाचा मुंबई व पुण्यास पुरवठा हाेताे; मात्र दुधाला मागणी नसल्याने दरारोज दोन लाख लिटर दुधाची पावडर निर्मिती करण्यात येत आहे. दूध पावडरलाही मागणी व दर नसल्याने पावडरचा साठा करावा लागत आहे. मे महिन्यात दररोज दोन लाख लिटर दूध पावडर व ९० हजार लिटर दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करण्यात आली. जून महिन्यात दररोज १ लाख ८० हजार लिटर दूध पावडर व ८० हजार लिटर दुग्धजन्य पदार्थ निर्मिती सुरू असल्याचे दुग्धविकास कार्यालयातून सांगण्यात आले.