शिराळ्यात दलित वस्तीसाठी २ कोटी

By Admin | Updated: February 10, 2015 23:55 IST2015-02-10T22:42:39+5:302015-02-10T23:55:16+5:30

दिलीप कांबळे : भाजप सदस्य नोंदणी आढावा कार्यक्रम

2 crore for Dalit habitation in winter | शिराळ्यात दलित वस्तीसाठी २ कोटी

शिराळ्यात दलित वस्तीसाठी २ कोटी

कोकरुड : सरकार चालवायला चांगली माणसं लागतात. यासाठी शिवाजीराव नाईक यांच्यासाख्या अनुभवी माणसांची गरज आहे. भाजप सदस्य नोंदणीमध्ये शिराळा मतदारसंघाने घेतलेली आघाडी आमदार नाईक यांचा भविष्यकाळ उज्वल करील. शिराळा मतदारसंघातील दलित वस्तीतील विविध कामांसाठी मी २ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करीत आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री दिलीप कांबळे यांनी केले.शिराळा येथील भाजप सदस्य नोंदणीच्या आढावाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार शिवाजीराव नाईक, भाजप समन्वयक मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, माजी आमदार भगवानराव साळुंखे, प्रताप पाटील, बापूसाहेब शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुखदेव पाटील यांनी स्वागत केले.
जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड म्हणाले, सांगली जिल्ह्यामध्ये भाजप सदस्य नोंदणीत शिराळा मतदारसंघ आघाडीवर आहे. आमदार नाईक यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत व वेगाने सदस्य नोंदणी सुरू आहे. त्यांचा आदर्श जिल्ह्यातील इतर नेत्यांनी घ्यावा. आठ विधानसभा मतदारसंघात प्रत्येक मतदारसंघात १ लाख सदस्य नोंदणी करावी,असे आवाहन गरुड यांनी केले.
आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, आमच्या मतदारसंघातील शिराळा व वाळवा तालुक्यातील गावात आतापर्यंत सुमारे ३५ हजारांहून अधिक सदस्य नोंदणी झाली आहे. लवकरच आम्हाला दिलेले ५० हजाराचे उद्दिष्ट पूर्ण करणार आहोत. यापुढील काळात पक्षाचा कार्यक्रम अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने माझे कार्यकर्ते पार पाडतील. मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्यावतीने जास्तीत-जास्त लोकहिताची कामे करणार आहोत. माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रल्हाद पाटील, उत्तम निकम, बंडा डांगे, उत्तम पाटील, गजानन पाटील, डॉ. एस. व्ही. पाटील, शहाजी पाटील, हेमंत पाटील, आनंदराव पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: 2 crore for Dalit habitation in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.