शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

Sangli: कर्जाच्या आमिषाने २ कोटी १९ लाखांची फसवणूक; ठाण्यातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 12:35 IST

तासगाव (जि. सांगली ) : कोट्यवधी रुपये कर्जाचे आमिष दाखवून तब्बल २ कोटी १९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार ...

तासगाव (जि. सांगली) : कोट्यवधी रुपये कर्जाचे आमिष दाखवून तब्बल २ कोटी १९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शिरीषकुमार देशपांडे, श्रीकांत चव्हाण, सोनल देशपांडे, सूर्यकांत नंदकिशोर शर्मा (सर्व रा. अरुणराव देशपांडे फ्लॅट नं. १४, बिल्डिंग नं. सी.डी-६३, मातृछाया बंगलोसमोर, श्रीरंग रोड, ठाणे) यांच्यावर तासगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दीपक नेताजीराव मोरे (रा. बिरणवाडी, ता. तासगाव) यांनी फिर्याद दिली आहे.१ जानेवारी २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत तासगाव येथील सरस्वतीनगर (वासुंबे) येथे फिर्यादी दीपक मोरे यांना विविध फायनान्स कंपनीकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवले. मोरे यांचा विश्वास संपादन करीत त्यांच्या बँक खात्यामार्फत व रोख स्वरूपात २ कोटी २६ लाख १०० रुपये संशयितांनी घेतले.मात्र, कोणत्याही फायनान्स कंपनीचे कर्ज मंजूर न करता संशयितांनी संगनमत करून फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मोरे यांनी पैसे परत मागितले. तेव्हा ७ लाख रुपये ८ मे २०२४ पर्यंत टप्प्याटप्प्यात परत दिले. उर्वरित रक्कम २ कोटी १९ लाख १०० रुपये परत दिले नाहीत. मोरे यांना एसबीआय व डून व्हॅली फायनान्स ॲन्ड लेझीग लिमिटेड या फायनान्स कंपनीचे कर्ज मंजुरीचे बनावट पत्रक दिले. २ कोटी १९ लाख १०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मोरे यांनी फिर्याद दिली.

टॅग्स :SangliसांगलीthaneठाणेfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस