शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

घरच्या ओढीने १,७०० किलोमीटर सायकल प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 00:22 IST

लॉकडाउनमुळे गेला रोजगार; तरुणाने गाठले सांगलीहून ओडिशातील बदसुराई गाव

चंद्रकांत कित्तुरे ।

कोल्हापूर : कोरोनाला रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर त्याचा रोजगार गेला. घरी बसून रहायचे हातात केवळ तीन हजार रुपये. गावी जायेच तर ते १७०० किलोमीटरवर. वाहन किंवा रेल्वेने जायचे तर तो मार्गही बंद झालेला. काय करायचे ? कसे दिवस काढायचे? या चिंतेत कसाबसा आठवडा काढला. असेच बसून राहिले तर जगायचे कसे असा प्रश्न काळीज पोखरू लागला. अखेर निर्णय घेतला, गावी जायचे. तेही सायकलने. अखेर १७०० किलोमीटर सायकलवरुन प्रवास करत आपले गाव गाठला.

ही कहाणी आहे सांगलीतील एका फौंड्रीत रोजंदार म्हणून काम करणाऱ्या २० वर्षीय महेश जेना या तरुणाची. महेश रोजगारासाठी सात महिन्यांपूर्वी मित्रांसमवेत रेल्वेने सांगलीत आला. कुपवाड एमआयडीसीत एका फौंड्रीत काम करु लागला. महिन्याला १५ हजार रुपये पगार. जाण्यायेण्यासाठी त्याने एक जुनी सायकल १५०० रुपयांना विकत घेतली. लॉकडाऊननंतर कंपनीने पुढील आदेश येईपर्यंत कामावर येवू नका, असे सांगितले.सोलापूर, हैदराबाद, श्रीकाकुलम, गंजममार्गे ओडिशातील बदसुराईमार्गे तो गावाच्या वेशीवर सात एप्रिलला सायंकाळी पोहोचला. मात्र ग्रामस्थांनी वेशीवरच त्याला अडविले. पोलिसांनी तातडीने येवून त्याला ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. अखेर होम क्वारंटाईनचा शिक्का मारुन त्याला विचित्रपूर येथील संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. क्वारंटाईनमध्ये पाच दिवस गेले आहेत आणखी नऊ दिवसांनी तो त्याच्या घरात पोहोचेल.दररोज सोळा तास प्रवासकिमान १५ दिवस तरी घरी पोहोचायला लागतील, असे महेशला जाताना वाटले होते. रस्त्यावर एखाद्या संस्थेकडून मिळणारे अन्नाचे पाकिट घेवून पोटाची भूक भागविली.रात्री बाराच्या सुमारास धाब्यावर, एखाद्या मंदिरात किंवा रस्त्याकडेला झाडाखाली रात्र घालवायची असा सुमारे दररोज १६ तास सलग सात दिवस त्याने सायकल प्रवास केला.

टॅग्स :Sangliसांगलीcorona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेश