शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी-शिक्षक १४ मार्चपासून बेमुदत संपावर

By अशोक डोंबाळे | Updated: February 25, 2023 18:36 IST

पेन्शन नाही तर मतदान नाहीच

सांगली : शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संघटनेने सनदशीर मार्गाने आंदोलन करूनही राज्य सरकारकडून नेहमी नकार घंटाच आहे, असा आरोप अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ उपाध्यक्ष विश्वास काटकर यांनी केला. तसेच राज्य सरकारच्या या भूमिकेमुळेच कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता असल्यामुळे राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी, शिक्षक दि. १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाणार आहेत, असा इशाराही त्यांनी दिला.राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक संघटनांतर्फे दि. १४ मार्चच्या संपाच्या तयारीसाठी सांगलीत शनिवारी कर्मचारी, शिक्षकांचा मेळावा झाला. या मेळाव्यात अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष काटकर बोलत होते. यावेळी गणेशजी देशमुख, अविनाश दौंड, सुरेंद्र सरतापे, मारुती शिंदे, अनिल लवेकर, पुणे विभागीय सचिव पी. एन. काळे, जे. के. महाडिक, डी. जी. मुलाणी, एस. एच. सुर्यवंशी, संजय व्हनमाने, गणेश धुमाळ आदी उपस्थित होते.विश्वास काटकर म्हणाले, कोरोना महामारीला रोखण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कोणताही कसूर न करता जनतेची सेवा केली आहे. शासनाची ५० टक्के पदे रिक्त असताना या कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम करून जनतेला सेवा दिली आहे. त्यामुळे अशा कर्मचारी-शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची जबाबदारी सुद्धा मायबाप शासनाचीच आहे. पण शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारची नेहमीच नकार घंटा आहे. यामुळेच कर्मचाऱ्यांमध्ये सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे.मेळाव्याला शिक्षक संघटनेचे नेते विश्वनाथ मिरजकर, बाबासाहेब लाड, झाकीरहुसेन मुलाणी, सुधाकर माने, शिक्षक भारतीचे कृष्णा पोळ, सुनील गुरव, सॅलरी सोसायटीचे अध्यक्ष नित्यानंद मोहिते, शरद पाटील, सुलताना जमादार, मिलिंद हारगे, संदीप सकट, आकाराम चौगुले, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.

जुनी पेन्शन लागू झालीच पाहिजे : गणेश देशमुखमध्यवर्ती संघटनेचे कोषाध्यक्ष गणेश देशमुख म्हणाले, एनपीएसधारकांना सेवानिवृत्तीनंतर कोणतेही लाभ मिळत नाहीत. अतिशय कमी म्हणजे तीन ते पाच हजारांपर्यंत पेन्शन मिळू शकते. केंद्र सरकारने पीएफआरडीए कायदा रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे.

पेन्शन नाही तर मतदान नाहीच : अमोल शिंदेशिक्षक आणि सर्व शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये शासनाविरोधात प्रचंड असंतोष आहे. शासनाने जुनी पेन्शन लागू केली नाही तर मतदानही सरकारला मिळणार नाही, असा इशारा इशारा जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी दिला.

टॅग्स :SangliसांगलीPensionनिवृत्ती वेतनagitationआंदोलन