शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

लोकसभेसाठी दीड हजार उमेदवार सांगलीत अर्ज भरणार, मराठा स्वराज्य संघाची घोषणा

By संतोष भिसे | Published: March 10, 2024 5:34 PM

मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी दिली माहिती

संतोष भिसे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: लोकसभेच्या निवडणुका बॅलेट पेपरवरच घेतल्या जाव्यात अशी आमची मागणी आहे. पण हम करेसो कायदा या मानसिकतेत असणाऱ्या भाजप सरकारकडून आमची मागणी मान्य होण्याची शक्यता नाही. त्यामुळे निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी दिली.

लोकसभेसह विधानसभा व अन्य सर्व निवडणुका ईव्हीएमवर न घेता बॅलेट पेपरवरच घ्याव्यात यासाठी मराठा स्वराज्य संघ पाठपुरावा करत आहे. सांगलीत पत्रकार बैठकीत साळुंखे म्हणाले, ईव्हीएममधून मतदान फिरवता येते हे सिद्ध झालेले नसले, तरी देशभरातून त्याला विरोध होत आहे. जपान, अमेरिका फ्रान्ससारख्या प्रगत देशांतही ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवरच निवडणुका घेतल्या जातात. भारतात ईव्हीएमच्या माध्यमातूनच भाजपने आतापर्यंत दोनवेळा बहुमत मिळविले यात शंका नाही. ईव्हीएमविरोधात विविध न्यायालयांत याचिका दाखल झाल्या आहेत, पण त्यांचा निकाल लोकसभा निवडणुकीपूर्वी लागण्याची शक्यता नाही. या पार्श्वभूमीवर आम्हीच ईव्हीएमच्या बंदोबस्तासाठी पुढाकार घेतला आहे.साळुंखे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील ७०० गावांतून प्रत्येकी दोन उमेदवार निवडणूक अर्ज भरणार आहेत. त्याशिवाय सांगली, मिरज शहरे व अन्य नगरपालिका क्षेत्रांतूनही मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज भरतील. जिल्हाभरातून सुमारे १५०० अर्ज भरले जाणार आहेत. ईव्हीएमची क्षमता ३८५ उमेदवारांची आहे. त्यामुळे निवडणूक बॅलेट पेपरवरच घेणे आयोगाला भाग पडेल. याकामी सकल मराठा क्रांती मोर्चासह समविचारी संघटनांचीही मदत घेणार आहोत.

यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. रणधीर कदम, प्रवक्ते संतोष पाटील, डॉ. महेश भोसले, सतीश जाधव, अण्णा कुरळपकर, सुधीर चव्हाण,  सतीश पाटील, सुनील दळवी, सर्जेराव पाटील पंडित पाटील आदी उपस्थित होते. संघटनेच्या जत तालुकाध्यक्षपदी ॲड. सिद्धू अण्णाप्पा महाडिक यांची निवड यावेळी जाहीर करण्यात आली.

"फडणवीसांनी फसविले"

मराठा आरक्षण व कुणबी प्रमाणपत्रे याबाबतीत राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप साळुंखे यांनी केला. ते म्हणाले, यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच मेंदू आहे. त्यांनी महाराष्ट्राचे राजकारण दूषित करण्याचे पाप केले आहे. सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाची अंलबजावणी केली नाही. राज्यातील सहा कोटी मराठा मतदारांनी येत्या निवडणुकांत त्यांना हिसका दाखवावा.

टॅग्स :Sangliसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस