शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीमध्ये आयर्विन पुलाजवळ १५ फूट पाणी, कृष्णा नदीवरील चार बंधारे पाण्याखाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 15:30 IST

शिराळा, वाळवा तालुक्याच्या काही भागांमध्ये दमदार पाऊस

सांगली : जिल्ह्यात सोमवारी दुपारपर्यंत पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली होती. पण सर्वत्र ढगाळ हवामान होते. दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी सुरू आहेत. आयर्विन पुलाजवळ १५ फुटापर्यंत पाणी आले आहे. शिराळा, वाळवा तालुक्याच्या काही भागांमध्ये पावसाची दमदार पाऊस सुरू आहे. गेल्या दहा दिवसांच्या संततधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नद्या दुथडी भरून वाहत असून, कृष्णा नदीवरील चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत.दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, कडेगाव तालुक्यांसह मिरज, पलूस तालुक्यातही गेल्या दहा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. शेतात सर्वत्र पाणीच पाणी साचून राहिले आहे. नदी, ओढे, नाले भरून वाहत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत.

कृष्णा नदीवरील चार बंधारे पाण्याखालीजिल्ह्यात संततधार पाऊस सुरूच असल्यामुळे कृष्णा नदीवरील जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे. वाळवा तालुक्यातील बहे, मिरज तालुक्यातील डिग्रज, सांगली आणि म्हैसाळ, असे चार बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे तेथील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळवली आहे.

गेल्या २४ तासातील पाऊससोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासातील तालुकानिहाय पाऊस मिलीमीटर मध्ये पुढीलप्रमाणे आहे. मिरज तालुका २४.४ मिलीमीटर, जत २५.४, खानापूर ४४.८, वाळवा १७.९, तासगाव ३६.४, शिराळा ३८.५, आटपाडी १९.७, कवठेमहांकाळ ३८.६, पलूस ३५.७ आणि कडेगाव तालुक्यात ४९.८ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

कृष्णा नदीची पाणीपातळीठिकाण -पाणी पातळी (फूट इंचामध्ये)

  • कृष्णा पूल कराड - ६.०५
  • बहे पूल - ५.६
  • ताकारी पूल - १८
  • भिलवडी पूल - १९.०२
  • आयर्विन - १५
  • राजापूर बंधारा - २१
टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस