शिराळा तालुक्यात १४८ कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:21 IST2021-05-29T04:21:20+5:302021-05-29T04:21:20+5:30

शिराळा : तालुक्यात शुक्रवारी ५० गावांमध्ये १४८ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शिराळा, मांगले, सांगाव ही ...

148 corona patients in Shirala taluka | शिराळा तालुक्यात १४८ कोरोना रुग्ण

शिराळा तालुक्यात १४८ कोरोना रुग्ण

शिराळा : तालुक्यात शुक्रवारी ५० गावांमध्ये १४८ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शिराळा, मांगले, सांगाव ही हॉटस्पॉट गावे झाली आहेत. गृहविलगीकरण कक्षात असणाऱ्या एक हजार रुग्णांची संस्था विलगीकरण कक्षात कशी सोय करायची, हा मोठा प्रश्न प्रशासनापुढे आहे. मांगले २४, सांगाव १३, देववाडी, मणदूर प्रत्येकी ८, शिराळा ७, पाचुम्बरी, पाडळेवाडी, उपवळे प्रत्येकी ५, चिखलवाडी, कोकरूड, कुसाईवाडी प्रत्येकी ४, बिळाशी, चिंचोली, मेणी, शिरशी, तडवळे प्रत्येकी ३ यासह ५० गावांत १४८ रुग्ण आढळून आले आहेत. एकूण १२४७ ॲक्टिव्ह रुग्ण असून गृहविलगीकरण कक्ष ११५२, संस्था विलगीकरण कक्ष ७, उपजिल्हा रुग्णालय ४९, कोकरूड ग्रामीण रुग्णालय २५, स्वस्तिक कोविड सेंटर ३, मिरज कोविड रुग्णालय ४, सांगली शासकीय रुग्णालय ३, खाजगी रुग्णालय ५ असे रुग्ण उपचार घेत आहेत.

Web Title: 148 corona patients in Shirala taluka