सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात नव्याने १४ रुग्णांची नोंद झाली. यात सर्वाधिक पाच रुग्ण कवठेमहांकाळ तालुक्यातील आहेत. दिवसभरात सहा जण कोरोनामुक्त झाले.नवीन १४ रुग्णांमध्ये सांगली, मिरज शहरात प्रत्येकी एक, कडेगाव १, पलूस २, तासगाव २, कवठेमहांकाळ ५, वाळवा १ आणि मिरज तालुक्यात एक रुग्ण आढळला. आरोग्य प्रशासनाने केलेल्या ७७ जणांच्या आरटीपीसीआर तपासणीतून ११, तर रॅपिड ॲन्टिजनच्या ७५ नमुने तपासणीतून तीन रुग्ण बाधित आढळले.
सांगली जिल्ह्यात १४ जणांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 12:01 IST