शिराळा तालुक्यात १३० रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:21 IST2021-06-01T04:21:01+5:302021-06-01T04:21:01+5:30
शिराळा : तालुक्यात सोमवारी ३९ गावांमध्ये १३० नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शिराळा, मांगले, सागाव, मणदूर, तडवळे ...

शिराळा तालुक्यात १३० रुग्ण
शिराळा : तालुक्यात सोमवारी ३९ गावांमध्ये १३० नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शिराळा, मांगले, सागाव, मणदूर, तडवळे ही हॉटस्पॉट गावे झाली आहेत.
सागाव २०, तडवळे १४, किनरेवाडी, मांगले, उपवळे प्रत्येकी ७, चिंचोली, शिरशी प्रत्येकी ६, इंगरुळ, कोकरूड प्रत्येकी ५, देववाडी, गिरजवडे, कापरी प्रत्येकी ४ यासह ३९ गावांत १३० रुग्ण आढळून आले आहेत.
एकूण १,३६७ सक्रिय रुग्ण असून, गृहविलगीकरण कक्ष १२७ , संस्था विलगीकरण कक्ष ८, उपजिल्हा रुग्णालय ४९, कोकरूड ग्रामीण रुग्णालय १७, स्वस्तिक कोविड सेंटर ११, मिरज कोविड रुग्णालय ४, सांगली शासकीय रुग्णालय २, खासगी रुग्णालय ५ असे रुग्ण उपचार घेत आहेत.