शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात १२२ फुलपाखरांच्या प्रजाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 16:27 IST

नवाब, यामफ्लाय, कॉमन मॅप, कॉमन बँडेड, पिकॉक फुलपाखरांचा सहभाग

शिराळा : सह्याद्री व्याघ्रप्रकल्पामध्ये २० सप्टेंबर ते १३ ऑक्टोबरदरम्यान द्वितीय फुलपाखरू सर्वेक्षण पार पडले. सह्याद्री व्याघ्रसंवर्धन प्रतिष्ठानच्या सह्याद्री वाइल्डलाइफ रिसर्च फॅसिलिटीच्या सिटीझन सायन्स उपक्रमाअंतर्गत राज्यभरातून एकूण ३८ फुलपाखरूप्रेमींनी या सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतला होता. या सर्वेक्षणमध्ये एकूण १२२ फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद करण्यात आली आहे.या सर्वेक्षणात चार आठवड्यांतील प्रत्येक शनिवार-रविवार व्याघ्रप्रकल्पामधील क्षेत्रीय कर्मचारी व सहभागी फुलपाखरूप्रेमी यांच्या माध्यमातून एकूण ७५ नियतक्षेत्रांमध्ये हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. सर्वेक्षणादरम्यान जंगल, गवताळ भाग, सडे व पाणथळ भाग अशा सर्व अधिवासांमध्ये सकाळी व सायंकाळी सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये अनेक महत्त्वपूर्ण व स्थानिक फुलपाखरांच्या नोंदी केल्या. यामध्ये महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्लू मोरमोन, मलबार ट्री-निम्फ, ब्लू-ओक लीफ, सदर्न ब्लू-बॉटल, क्रिमसन रोज तसेच नवाब, यामफ्लाय, कॉमन मॅप, कॉमन बँडेड पिकॉक अशा अनेक सुंदर फुलपाखरांच्या नोंदी करण्यात आल्या. जगातील सर्वांत मोठ्या आकाराच्या एटलास-माँथ पतंगाचीही नोंद या सर्वेक्षणमध्ये करण्यात आली.पावसाळ्यानंतर जंगलामध्ये फुलणारा रंगीत फुलोरा व परागीभवन करत पराग घेण्यासाठी फुलपाखरांची सुरू होणारी चढाओढ आणि याचदरम्यान विद्यार्थी व नागरिकांमध्ये फुलपाखरांबद्दल प्रेम व निसर्ग संवर्धनासाठी जागृती निर्माण करण्यासाठी देशभरात आयोजित केला जाणारा ‘बिग बटरफ्लाय मंथ’अंतर्गत हे फुलपाखरू सर्वेक्षण आयोजित केले होते.

पुढील काही महिन्यांत पक्षी सर्वेक्षण आयोजित होणार आहे. यामध्ये पक्षिप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये फुलपाखरांबद्दल प्रेम व निसर्ग संवर्धनासाठी जागृती निर्माण करण्यासाठी देशभरात हे फुलपाखरू सर्वेक्षण आयोजित केले होते. - नंदकुमार नलवडे, वनक्षेत्रपाल, चांदोली

टॅग्स :Sangliसांगलीforestजंगल