कडेगाव तालुक्यात लसीचे १२०० डोस उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:29 IST2021-05-06T04:29:14+5:302021-05-06T04:29:14+5:30
कडेगाव : कडेगाव तालुक्यात काेराेना प्रतिबंधक लसीचे १२०० डोस उपलब्ध झाले असून हे डोस ४५ वर्षांवरील नागरिकांना ...

कडेगाव तालुक्यात लसीचे १२०० डोस उपलब्ध
कडेगाव : कडेगाव तालुक्यात काेराेना प्रतिबंधक लसीचे १२०० डोस उपलब्ध झाले असून हे डोस ४५ वर्षांवरील नागरिकांना देण्यात
येणार आहेत. यातही दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांना प्राधान्याने
लसीकरण करण्यात येणार आहे, असे
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कडेगाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय
चिंचणी व कडेगाव, तसेच प्राथमिक आरोग्य
केंद्र मोहित्यांचे वडगाव, नेवरी, हिंगणगाव बुद्रुक व खेराडे वांगी येथे प्रत्येकी २००
लसी वितरित करण्यात आल्या. संबधित आरोग्य केंद्रातून उपकेंद्रांमध्येही लसीचे डोस विभागून दिले जाणार आहेत. त्यामुळे
प्रत्येक उपकेंद्रात फक्त ३० डोस मिळतील. बुधवारी दुपारी लस उपलब्ध झाल्याने काही उपकेंद्रांच्या ठिकाणी डोस तात्काळ नागरिकांना दिले आहेत, तर काही ठिकाणी गुरुवारी लसीकरण केले जाणार आहे.