शिराळा तालुक्यात नवीन ११८ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:21 IST2021-06-02T04:21:38+5:302021-06-02T04:21:38+5:30

शिराळा : तालुक्यात मंगळवारी दि. १ जून रोजी ३९ गावांमध्ये ११८ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शिराळा, ...

118 new patients in Shirala taluka | शिराळा तालुक्यात नवीन ११८ रुग्ण

शिराळा तालुक्यात नवीन ११८ रुग्ण

शिराळा : तालुक्यात मंगळवारी दि. १ जून रोजी ३९ गावांमध्ये ११८ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शिराळा, मांगले, सांगाव, गिरजवडे, मणदूर, तडवळे हॉटस्पॉट गावे झाली आहेत.

सांगाव १४, गिरजवडे १०, शिराळा, बिळाशी, अंत्री बुद्रुक प्रत्येकी ९, कणदूर ७, कांदे, ठाणापुडे प्रत्येकी ६, मांगले ४ यासह ३९ गावात ११८ रुग्ण आढळून आले आहेत. एकूण १३८७ ॲक्टिव्ह रुग्ण असून गृह विलगीकरण कक्ष १२९०, संस्था विलगीकरण कक्ष ८, उपजिल्हा रुग्णालय ४९, कोकरुड ग्रामीण रुग्णालय १७, स्वस्तिक कोविड सेंटर ११, मिरज कोविड रुग्णालय ४, सांगली शासकीय रुग्णालय २, खासगी रुग्णालय ५ असे रुग्ण उपचार घेत आहेत.

Web Title: 118 new patients in Shirala taluka