ढालगाव मारामारीतील ११ संशयितांना कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:45 IST2021-05-05T04:45:44+5:302021-05-05T04:45:44+5:30
आयपीएलमधील मुंबई विरुद्ध चेन्नई सामना संपल्यानंतर फटाके उडवल्याच्या कारणावरून ढालगाव येथे रविवारी दोन गटांत जोरदार मारामारी झाली होती. या ...

ढालगाव मारामारीतील ११ संशयितांना कोठडी
आयपीएलमधील मुंबई विरुद्ध चेन्नई सामना संपल्यानंतर
फटाके उडवल्याच्या कारणावरून ढालगाव येथे रविवारी दोन गटांत जोरदार मारामारी झाली होती. या मारहाणीत दोन्ही गटांचे सहाजण जखमी झाले आहेत. दरम्यान, कवठेमहांकाळ पोलिसांनी श्रीकांत कोंडीबा बंडगर (वय ३०, रा. डोर्ली), बिरू पांडुरंग कोळेकर (२८, रा. आरेवाडी), सागर पांडुरंग मंडले (२४), सागर प्रकाश चव्हाण (२७), कृष्णा अंकुश चव्हाण (२६), नवनाथ ऊर्फ आनंदा दादासाहेब मलमे (२७), सदानंद ऊर्फ सोमनाथ उत्तम मलमे (२३), समाधान दादासाहेब मलमे (२८), सुनील उत्तम मलमे (२६), विशाल मनोहर मलमे (२३), महेश शिवराम मंडले (२५, सर्व रा. ढालगाव) यांना अटक केली होती. या संशयितांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली.
दरम्यान, ढालगाव, आरेवाडी, नागज येथे चार संशयितांना फिरवण्यात आले. त्यामुळे गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांत जरब बसली आहे. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्यासह पोलीस उपस्थित होते.